हत्येप्रकरणात अभिनेता अटकेत; मॅनेजरने त्याच्याच फार्महाऊसमध्ये केली आत्महत्या

कन्नड अभिनेता दर्शन थुगूदीपाचा मॅनेजर श्रीधर याने टोकाचं पाऊल उचललंय. दर्शनच्या बेंगळुरूमधील फार्महाऊसमध्येच त्याने आयुष्य संपवल्याचं कळतंय. दर्शनला एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हत्येप्रकरणात अभिनेता अटकेत; मॅनेजरने त्याच्याच फार्महाऊसमध्ये केली आत्महत्या
Darshan Thoogudeepa Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 3:02 PM

प्रसिद्ध कन्नड अभिनेता दर्शन थुगूदीपाला रेणुकास्वामी या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत याप्रकरणी बऱ्याच धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आता दर्शनचा मॅनेजर श्रीधर याने मंगळवारी आत्महत्या केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार श्रीधरने दर्शनच्या बेंगळुरूमधील फार्महाऊसमध्ये त्याने आपला जीव घेतला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने एक चिठ्ठीसुद्धा लिहिली आहे. माझ्या आत्महत्येच्या प्रकरणात कृपया माझ्या कुटुंबीयांना गुंतवू नका, अशी विनंती त्याने या सुसाइड नोटद्वारे पोलिसांना केली आहे. त्याचप्रमाणे एकाकीपणातून हे टोकाचं पाऊस उचलल्याचंही त्याने त्यात स्पष्ट केलंय. आत्महत्येपूर्वी श्रीधरने एक व्हिडीओ मेसेजसुद्धा रेकॉर्ड केला होता. याप्रकरणात कुटुंबीयांना खेचू नका, अशी विनंती त्याने व्हिडीओतून पोलिसांनी केली आहे. श्रीधरची आत्महत्या आणि रेणुकास्वामीची हत्या या दोन्ही घटनांमध्ये काही कनेक्शन आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

33 वर्षीय रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी दर्शनसह 16 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. दर्शनसोबत कथितपणे रिलेशनशिपमध्ये असलेली अभिनेत्री पवित्रा गौडाला रेणुकास्वामीने अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप आहे. याच नाराजीतून दर्शनने त्याच्या हत्येची सुपारी दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शन सतत मारेकऱ्यांच्या संपर्कात होता आणि रेणुकास्वामीचं अपहरण करून सर्वांत आधी त्याच्याकडेच नेण्यात आलं होतं. रेणुकास्वामीच्या हत्येआधी त्याला इलेक्ट्रिक शॉक देऊन टॉर्चर करण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलंय.

रेणुकास्वामीचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांना त्याच्या शरीरावर गरम लोखंडाच्या रॉडने दिलेल्या चटक्याचे व्रण दिसून आले. त्याची नाक आणि जीभसुद्धा कापण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर रेणुकास्वामीचा जबडासुद्धा तोडण्यात आला होता. त्याच्या संपूर्ण शरीरातील असंख्य हाडं मोडलेली होती. रेणुकास्वामीच्या डोक्यालाही बराच मार होता. रेणुकास्वामी चित्रदुर्गमधील एका मेडिकल शॉपमध्ये असिस्टंट म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं.

हे सुद्धा वाचा

रेणुकास्वामीची हत्या 9 जून रोजी दक्षिण-पश्चिम बेंगळुरूमध्ये जप्त केलेली वाहनं पार्क करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शेडमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या नाल्यात फेकण्यात आला होता. रेणुकास्वामीने दर्शनची प्रेयसी पवित्रा गौडाला सोशल मीडियावर ट्रोलदेखील केलं होतं. यामुळे दर्शनने त्याचा सूड घेतला.

PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'
Sadavarte Video: सदावर्तेंचा सुरेश धसांवर टीका, 'हवालदार म्हणून काम..'.
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?
Karad Property Video : घरगडी कराड कसा झाला अरबपती? संपत्ती नेमकी किती?.
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक
Walmik Karad Video : कराडवर मकोका अन्10 मिनिटांत परळी बंदची हाक.
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.