Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साऊथ अभिनेत्याचा भयानक अपघात; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला उजवा पाय

म्हैसूर : कन्नड अभिनेता सूरज कुमार ऊर्फ ध्रुवन याचा 24 जून रोजी बेगुरजवळ म्हैसूर-गुंडलुपर महामार्गावर दुचाकी चालवताना मोठा अपघात झाला. या अपघातानंतर त्याला तातडीने म्हैसूर इथल्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूरजच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाली होती. अखेर त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा गुडघ्याखालील उजवा पाय कापावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 वाजता एका […]

साऊथ अभिनेत्याचा भयानक अपघात; जीव वाचवण्यासाठी कापावा लागला उजवा पाय
Suraj KumarImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 26, 2023 | 5:27 PM

म्हैसूर : कन्नड अभिनेता सूरज कुमार ऊर्फ ध्रुवन याचा 24 जून रोजी बेगुरजवळ म्हैसूर-गुंडलुपर महामार्गावर दुचाकी चालवताना मोठा अपघात झाला. या अपघातानंतर त्याला तातडीने म्हैसूर इथल्या मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सूरजच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाली होती. अखेर त्याचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांना त्याचा गुडघ्याखालील उजवा पाय कापावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी 4 वाजता एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना सूरजचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची दुचाकी एका लॉरीवर धडकली. म्हैसूरहून उटीला जात असताना हा अपघात झाला.

24 वर्षांचा सूरज हा अभिनेता डॉ. राजकुमार यांच्या पत्नी परवथम्मा यांचा पुतण्या आहे. तर चित्रपट निर्माते एस. ए. श्रीनिवास यांचा तो मुलगा आहे. या अपघातानंतर कन्नड सुपरस्टार शिवराज कुमार आणि त्याच्या पत्नीने सूरजची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. अनुप अँथनी दिग्दर्शित ‘भगवान श्रीकृष्ण परमात्मा’ या चित्रपटातून तो अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार होता. कन्नड स्टार दर्शनने हा चित्रपट लाँच केला होता. मात्र नंतर काही कारणास्तव त्याचं काम रखडलं होतं. मधल्या काळात सूरज ‘रथम’ नावाच्या दुसऱ्या चित्रपटात काम करत होता.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by DHRUWAN ??? (@dhruwan____07)

सूरजने ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरसोबतचं एक प्रोजेक्ट स्वीकारलं होतं. त्याने या चित्रपटाची ऑफर स्वीकारली होती. मात्र आता अपघातामुळे हा चित्रपट पूर्ण होऊ शकेल की नाही किंवा त्यात सूरजची भूमिका असेल की नाही हे मात्र अस्पष्ट आहे.

याआधी हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये गाणं गायलेली गायिका रक्षिता सुरेश ही मलेशियात एका मोठ्या कार अपघातातून थोडक्यात बचावली होती. मलेशियातील विमानतळाकडे जाताना तिची कार दुभाजकाला जोरात धडकली. हा अपघात इतका भयंकर होता की त्याच्या आठवणीने अजूनही थरकाप उडत असल्याचं तिने लिहिलं होतं. रक्षिताने मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन 2’ या चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनमधील गाणं गायलं आहे. पोन्नियिन सेल्वन 1 या चित्रपटातीलही एक गाणं तिच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आलं होतं.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.