‘कांटा लगा’ फेम शेफालीने पतीसोबत कॅमेरासमोर केलं लिप लॉक; व्हिडीओ व्हायरल

शेफाली-परागचं खुल्लम खुल्ला प्रेम; लिप लॉक व्हिडीओवर नेटकऱ्यांचे कमेंट्स

'कांटा लगा' फेम शेफालीने पतीसोबत कॅमेरासमोर केलं लिप लॉक; व्हिडीओ व्हायरल
शेफाली जरीवालाचा व्हिडीओ व्हायरलImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Dec 19, 2022 | 1:13 PM

मुंबई: ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाने नुकताच तिचा 40 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. या व्हिडीओमध्ये शेफाली कॅमेरासमोर पती पराग त्यागीसोबत लिपलॉक करताना दिसत आहे. राऊंट ट्रॉली कॅमेरावर शेफाली आणि परागने हा व्हिडीओ शूट केला. या दोघांच्या रोमान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शेफाली आणि पराग यांच्या किसचा व्हिडीओ व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी दोघं कॅमेरासमोर एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करताना दिसले. पराग आणि शेफाली हे अशा सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत, जे पापाराझी आणि फोटोग्राफर्ससमोरही मोकळेपणे प्रेम व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वीच या दोघांचा एअरपोर्टवरील लिपलॉकचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

हे सुद्धा वाचा

शेफाली आणि परागला अनेकदा यासाठी ट्रोलसुद्धा केलं गेलं. शेफालीने बिग बॉसच्या 13 व्या सिझनमध्ये भाग घेतला होता. सिद्धार्थ शुक्लासोबत तिची खूप चांगली मैत्री झाली होती. विशेष म्हणजे करिअरच्या सुरुवातीला सिद्धार्थ आणि शेफाली हे एकमेकांना डेट करायचे, असंही म्हटलं जातं. मात्र बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये कोणत्याही प्रकारची कटुता दिसली नाही.

‘कांटा लगा’ या रिमिक्स गाण्यात झळकल्यानंतर शेफालीला खूप प्रसिद्धी मिळाली. या गाण्यामुळेच ती ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जाऊ लागली. शेफाली आणखीही काही म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली.

शेफालीने 2004 मध्ये मीत ब्रदर्सचा संगीतकार हरमीत सिंगशी लग्न केलं होतं. 2009 मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर वर्षभराने तिने अभिनेता पराग त्यागीशी लग्नगाठ बांधली. परागने ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेत अंकिता लोखंडेच्या भावाची भूमिका साकारली होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.