Kantara: ‘कांतारा’चा आणखी एक विक्रम; 41 दिवसांत केली कमाल

'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर कमाल; आणखी एक रेकॉर्ड केला आपल्या नावे

Kantara: 'कांतारा'चा आणखी एक विक्रम; 41 दिवसांत केली कमाल
KantaraImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Nov 10, 2022 | 3:12 PM

कर्नाटक- ऋषभ शेट्टीचा ‘कांतारा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अद्याप कमाल करताना दिसतोय. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास महिना उलटला तरी थिएटरमध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली नाही. एकीकडे या चित्रपटाने 276.56 कोटी रुपयांपेक्षा गल्ला जमवला. तर दुसरीकडे ‘कांतारा’ने तिकिट विक्रीच्या बाबतीत नवा विक्रम केला आहे. मूळ कन्नड भाषेत असलेल्या या चित्रपटाने कर्नाटकमध्ये 1 कोटी तिकिटं विकल्याचा विक्रम केला आहे.

फक्त 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाच्या कन्नड व्हर्जनने 41 दिवसांत 151.80 कोटी रुपयांची कमाई केली. कांताराच्या जगभरातील कमाईचा आकडा आता 353 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

ऋषभ शेट्टीनेच कांताराचं दिग्दर्शन केलं आणि चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारली. 30 सप्टेंबर रोजी हा चित्रपट कन्नड भाषेत प्रदर्शित झाला. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता नंतर तो इतर भाषांमध्ये डब करण्यात आला. 14 ऑक्टोबर रोजी कांतारा हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला.

हे सुद्धा वाचा

कांताराने प्रदर्शनाच्या 41 व्या दिवशी कन्नड व्हर्जनद्वारे जवळपास 30 लाख रुपयांची कमाई केली. तर देशभरातील कमाईचा आकडा 2.30 कोटींवर पोहोचला. कांताराच्या हिंदी व्हर्जनची कमाई ही अजूनही चांगली आहे. मंगळवारी हिंदी व्हर्जनमधील कमाई 2.6 कोटी रुपये इतकी झाली.

केजीएफ-चाप्टर 1 आणि चाप्टर 2 या दोन्ही चित्रपटांना ‘कांतारा’ने चांगली टक्कर दिली आहे. हिंदी आणि तेलुगू व्हर्जनलाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

“कांतारा हा चित्रपट पॅन-इंडिया बनावा, या उद्देशाने मी काम केलं नव्हतं. कथा जितकी चांगली मांडता येईल, तितकं चांगलं यावर माझा भर होता. कथा चांगली होती म्हणून कांताराने स्वत: पुढची वाट शोधली. हे कसं झालं हे आम्हालाही कळलं नाही”, अशी प्रतिक्रिया ऋषभने दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.