‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने रश्मिकासोबत काम करण्यास दिला साफ नकार; म्हणाला “अशा अभिनेत्री..”
रश्मिकाबद्दल 'कांतारा' स्टार ऋषभ असं काही म्हणाला, ज्याची सोशल मीडियावर होतेय चर्चा
मुंबई: ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला. प्रेक्षक-समिक्षकांकडून या चित्रपटाचं, त्यातील कलाकारांच्या अभिनयाचं आणि दमदार कथानकाचं खूप कौतुक झालं. ‘कांतारा’ ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर दिग्दर्शक आणि अभिनेता ऋषभ शेट्टीच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रश्मिका मंदानाबद्दल असं काही म्हटलंय, ज्यामुळे त्याची सोशल मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.
Gulte.com ला दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभने रश्मिकासोबत काम करण्यात रस नसल्याचं म्हटलं. समंथा रुथ प्रभू, रश्मिका मंदाना, किर्ती सुरेश आणि साई पल्लवी या प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी कोणासोबत काम करायला तुला आवडेल, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला.
या प्रश्नाचं उत्तर देताना ऋषभ म्हणाला, “मी माझी स्क्रीप्ट पूर्ण केल्यानंतरच कलाकारांची निवड करतो. मी नवीन कलाकारांसोबत काम करण्यास प्राधान्य देतो, कारण त्यांना कोणते प्रतिबंध नसतात. या अभिनेत्रींना मी पसंत नाही करत.”
कोणत्याच अभिनेत्रीचं नाव न घेता तो पुढे म्हणाला, “मला ती पसंत नाही, मात्र मला साई पल्लवी आणि समंथाचं काम आवडतं.” आता ऋषभने असं का म्हटलंय, हे तोच स्पष्ट करू शकतो. मात्र त्याला रश्मिकासोबत काम करायची इच्छा नाही, हे मात्र यातून स्पष्ट झालं आहे.
View this post on Instagram
ऋषभने एका मुलाखतीत ‘कांतारा’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनचा किस्साही सांगितला. या चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनलाच प्रेक्षकांकडून खूप पसंती मिळाली होती. याच शूटिंगदरम्यान ऋषभचे दोन्ही खांदे डिस्लोकेट झाले होते. मात्र तरीही त्याने शूटिंग पूर्ण केलं.
“क्लायमॅक्स सीनचं शूटिंग करताना माझे दोन्ही खंदे डिस्लोकेट झाले होते. 360 डिग्री शॉटदरम्यान माझा एक खांदा डिस्लोकेट झाला होता. दुसऱ्या दिवशी आणखी एका सीक्वेन्सच्या शूटिंगदरम्यान माझा दुसरा खांदा डिस्लोकेट झाला. तरीसुद्धा मी शूटिंग पूर्ण केलं होतं”, असं ऋषभने सांगितलं.
कांतारा या चित्रपटाने जगभरात तब्बल 400 कोटींची कमाई केली. RRR, केजीएफ- चाप्टर 2, पोन्नियिन सेल्वन 1, ब्रह्मास्त्र आणि विक्रम या चित्रपटांनंतर कांतारा हा देशातील सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे.