‘83’मधून कपिल देव यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर आता रणवीर बॉक्स ऑफिसला क्लीन बोल्ड करण्याच्या तयारीत आहे. रणवीर त्याच्या आगामी ‘83’ सिनेमात भारताला क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाबाबत आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या सिनेमातून […]

‘83’मधून कपिल देव यांच्या मुलीची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या ‘गल्ली बॉय’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्यानंतर आता रणवीर बॉक्स ऑफिसला क्लीन बोल्ड करण्याच्या तयारीत आहे. रणवीर त्याच्या आगामी ‘83’ सिनेमात भारताला क्रिकेटमध्ये पहिला वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमाबाबत आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या सिनेमातून कपिल देव यांची मुलगी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

या सिनेमाबाबत अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यातच आता कपिल देव यांची मुलगी आमिया देव या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणार असल्याची माहिती आहे. पण, आमिया ही अभिनेत्री म्हणून नाही, तर असिस्टंट डायरेक्टर म्हणून या सिनेमात काम करणार आहे.

क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटीलने याबाबतची माहिती दिली. चिराग हा ‘83’ या सिनेमात पिता संदीप यांची भूमिका साकारणार आहे. त्यासाठी तो खूप मेहनत घेतो आहे. या सिनेमासाठी तो खूप उत्साहित असल्याचं त्याने सांगितलं.

या सिनेमामध्ये कपिल देव यांची भूमिका साकारण्यासाठी रणवीर अनेक दिवसांपासून तयारी करत आहे. तो क्रिकेट शिकत आहे आणि यासाठी त्याला खुद्द कपिल देव हे प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे रणवीरला कपिल यांच्या सानिध्यात राहून त्यांचं व्यक्तिमत्त्व आपल्या भूमिकेत उतरवण्यात मदत होणार आहे. लवकरच या सिनेमाचं शुटिंग सुरु होणार आहे.

या सिनेमामध्ये रणवीर सिंगसोबत चिराग पाटील, साकीब सलीम, पंकज त्रिपाठी, हार्डी संधू हे मुख्य भूमिकेत दिसतील. या सिनेमाचं दिग्दर्शन कबीर खान करत आहेत.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.