Bigg Boss 16 शोचा विजेता ठरल्यानंतर एनसी स्टॅनला मोठा धक्का; फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल सत्य
Bigg Boss 16 शोचा विजेता एनसी स्टॅन याच्यासोबत असं काय झालं? ज्यामुळे रॅपरला बसला मोठा धक्का... सध्या सर्वत्र एमसी स्टॅन याचीच चर्चा..
मुंबई : ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) चा विजेता आणि प्रसिद्ध रॅपर एमसी स्टॅन सतत यशाच्या उच्च शिखरावर चढताना दिसत आहे. ‘बिग बॉस १६’ प्रवेश केल्यानंतर एमसी स्टॅन याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. ‘बिग बॉस १६’ (Bigg Boss 16) शोच्या विजेत्याची घोषणा झाली आणि चाहत्यांसह विजेत्याने मोठ्या जल्लोषात आनंद साजरा केला. अभिनेता आणि बिग बॉस १६’ शोचा होस्ट सलमान खान (salman khan) याने विजेत्याचं नाव घोषित केलं आणि स्पर्धकांसह चाहते देखील चकित झाले. बिग बॉस १६’ मध्ये शिव ठाकरे (shiv thakare) आणि प्रियंका चौधरी यांमध्ये ‘कांटे की टक्कर’ होती. पण ‘बिग बॉस १६’ च्या ट्रॉफीवर एमसी स्टॅनचं नाव कोरलं गेलं. आता वेग-वेगळ्या शहरांमध्ये जावून एमसी स्टॅन स्वतःचे शो करत असतो. आता सर्वत्र एमसी स्टॅन याच्या नावाची चर्चा असते. त्याचे अनेक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
बिग बॉस १६ शोचा विजेता ठरल्यानंतर एमसी स्टॅन याने ए.आर.रहमान यांना देखील लोकप्रियतेच्या यादीत मागे टाकलं. पण आता खुद्द एमसी स्टॅन लोकप्रियतेच्या यादीत मागे राहिला आहे. नुकताच एक यादी समोर आली आहे. ज्यामध्ये गेल्या महिन्यात चाहत्यांनी सोशल मीडियावर एमसी स्टॅन याला नाही तर, अन्य सेलिब्रिटीला भरभरून प्रेम दिलं आहे.
एमसी स्टॅन याच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. नुकताच ऑरमॅक्स मीडियाने फेब्रुवारी महिन्याची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये फेब्रुवारी महिन्यातील लोकप्रिय सेलिब्रिटींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यादीमध्ये टॉप ५ सेलिब्रिटींची नावे आहे. सध्या सर्वत्र पाच लोकप्रिय सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत.
ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पहिल्या स्थानावर कपिल शर्मा असून दुसऱ्या स्थानावर एमसी स्टॅन आहे. तिसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री प्रियंका चौधरी आहे. चौथ्या क्रमांकावर अभिनेता सलमान खान असून पाचव्या क्रमांकावर शिव ठाकरे आहे. सध्या सर्वत्र ऑरमॅक्स मीडियाने जाहीर केलेल्या यादीची चर्चा रंगत आहे.
सांगायचं झालं तर, एमसी स्टॅनची सोशल मीडियावर पू्र्वीपासून लोकप्रियता प्रचंड आहे. बिग बॉसच्या घरात येताच स्टॅन, साजिद खान, शिव ठाकरे आणि अब्दु यांच्यासोबत मंडळीमध्ये गेम खेळताना दिसला. बिग बॉस संपल्यानंतर देखील अनेकदा मंडळीचे सदस्य पार्टी करतना एकत्र दिसले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.