सुनील ग्रोव्हरनंतर एक-एक कलाकाराने सोडली कपिल शर्माची साथ; कॉमेडियनने मांडली खदखद

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली.

सुनील ग्रोव्हरनंतर एक-एक कलाकाराने सोडली कपिल शर्माची साथ; कॉमेडियनने मांडली खदखद
Kapil sharma
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 9:21 AM

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माने बऱ्याच वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. 17 मार्च रोजी त्याचा ‘ज्विगाटो’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त कपिलने बऱ्याच मुलाखती दिल्या आहेत. अशाच एका मुलाखतीत तो ‘द कपिल शर्मा शो’मधील सहकलाकारांसोबत असलेल्या नात्याबाबत मोकळेपणे व्यक्त झाला. कपिलने याआधी एका मुलाखतीत कॉमेडियन सुनील ग्रोव्हरसोबत झालेल्या भांडणाबद्दल आपली चूक मान्य केली. रागाच्या भरात सर्वकाही झाल्याचं तो म्हणाला. सुनीलशिवाय त्याच्या शोमध्ये चंदन प्रभाकर, अली असगर, कृष्णा अभिषेक, उपासना सिंग हे कलाकारसुद्धा काम करायचे. मात्र एकानंतर एक अशा या कलाकारांनी ‘द कपिल शर्मा शो’ला रामराम केला.

सहकलाकारांच्या एक्झिटवर काय म्हणाला कपिल?

कपिल शर्माच्या शोमध्ये या कलाकारांची कमतरता आजही प्रेक्षकांना जाणवते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिलने या सहकलाकारांच्या एक्झिटवर प्रतिक्रिया दिली. “त्यांना जाऊन विचारा की ते का नाही थांबले? मी तर माझ्याच जागी आहे. माझं सुनीलसोबत भांडण झालं होतं. ते ठीक आहे. पण तुम्ही इन्स्टाग्राम पाहत असाल तर भारती सिंग आणि मी नेहमीच एकत्र असतो”, असं तो म्हणाला.

याविषयी तो पुढे म्हणाला, “भारतीचं तिचं प्रॉडक्शन सुरू केलं आहे. ती तिचं काम करतेय आणि त्यात ती व्यग्र आहे. ती त्यापैकी त्यांनी ज्यांनी भांडण झाल्यामुळे माझा शो सोडला. उपासना सिंगसुद्धा चित्रपटांमध्ये चांगलं काम करत आहेत. काही दिवसांपूर्वीच आमचं बोलणं झालं होतं. कृष्णासुद्धा माझा खूप चांगला मित्र आबे. त्यामुळे सुनील ग्रोव्हरला सोडून तुम्ही सर्वांना एकाच कॅटेगरीमध्ये नाही टाकू शकत. माझ्या बाजूला येऊन कोणी उभा आहे, असं मला वाटत नाही. या गोष्टीचा मी कधीच ताण घेतला नाही.”

हे सुद्धा वाचा

सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने सोडला होता शो

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे एकेकाळी एकमेकांचे खास मित्र होते. मात्र एके दिवशी असं काही घडलं ज्यामुळे सुनीलने कपिलचा शो सोडला आणि त्याच्यासोबतची मैत्रीही तोडली. सप्टेंबर 2018 मध्ये सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला होता. त्यापूर्वी विमानातील एका प्रवासादरम्यान कपिलने सुनीलवर हात उचलला अशी चर्चा होती. या घटनेनंतर कपिलने अनेकदा सुनीलची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश मिळालं नाही. आता नुकत्याच दिलेल्या मुलखतीत कपिलने त्याची चूक मान्य केली आहे.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.