मुलीने केली अशी डिमांड की ऐकून कपिल शर्मा ही चक्रावला, मग कार्तिक आर्यनला ही करावा लागली ही गोष्ट
मुलं कधी काय डिमांड करतील हे सांगता येत नाही. कपिल शर्माने देखील त्याच्या मुलीचा एक किस्सा सांगितला.
मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या चाहत्यांना आपल्या शोच्या माध्यमातून खूपच हसवतो. ‘द कपिल शर्मा शो हा अनेकांचा आता आवडता शो बनला आहे. या शोच्या माध्यमातून त्याचे जगभरात अनेक चाहते बनले आहेत. शोची लोकप्रियता इतकी आहे की प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री आपल्या सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी कपिलच्या शोला आवर्जून हजेरी लावतात. कपिल शर्मा या निमित्ताने त्यांच्यासोबत गप्पा मारतो आणि अनेक अशा गोष्टी शेअर करतो ज्यामुळे लोकांचं ही मनोरंजन होतं.
द कपिल शर्मा शो मध्ये अनेकदा त्याचं कुटुंब देखील उपस्थित असतं. तो नेहमी त्याच्या कुटुंबाबद्दल बोलत असतो. कपिल शर्माला एक मुलगी देखील आहे. आपल्या मुलीबद्दल बोलतांना त्याने एक गोष्ट शेअर केली. कार्तिक आर्यनला टीव्हीवर नाचताना पाहून त्याच्या मुलीने काय आग्रह केला हे त्याने सांगितलं.
कपिल शर्माने त्याची तीन वर्षांची मुलगी अनायरा बद्दल बोलत असताना सांगिततलं की,’माझी मुलगी आता फक्त 3 वर्षांची आहे आणि तिला वाटते की संपूर्ण जग टीव्हीच्या आत आहे आणि प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो. एक दिवस अनायराने कार्तिक आर्यनचा डान्स करतानाचा व्हिडिओ पाहिला आणि ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘पापा कार्तिक डान्स करत आहे’. तो आपल्या घरी का येत नाही’. जेव्हा मी हे कार्तिक आर्यनला हे सांगितले तेव्हा त्याने व्हिडिओ कॉल केला आणि अनायराशी फोनवर बोलला.
कपिल शर्माने पुढे सांगितले की, कार्तिक आर्यनशी बोलल्यानंतर आता तिने पेपा पिगशी बोलण्यासाठी आग्रह धरला. तिच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टरशी बोलण्याचा आग्रह ऐकून तो देखील चक्रावला. याची पत्नी गिन्नी तिच्या मैत्रिणीला तमग तिच्यासोबत तशा आवाजात बोलण्यास सांगितले आणि तिला बोलायला लावले, पण नंतर तिने व्हिडिओ कॉलवर बोलण्याचा आग्रह धरला.
कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांचा विवाह 2018 मध्ये झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना मुलगी झाली. कपिल शर्मा आपल्या कुटुंबासोबत नेहमीच छान वेळ घालवतो. अशा प्रकारे त्याने त्याच्या मुलीचा हा किस्सा एका एपिसोडमध्ये सांगितला.