करिश्मा, करीना नाही तर, कपूर कुटुंबाच्या ‘या’ लेकीने वयाच्या 43 व्या घेतला मोठा निर्णय

Kapoor Family : करिश्मा, करीना नाही तर, वयाच्या 43 व्या वर्षी कपूर कुटुंबाची 'ही' लेक मोडणार परंपरा! कोण आहे 'ती'? सध्या सर्वत्र कपूर कुटुंब आणि कुटुंबातील मुलींची चर्चा... करिश्मा, करीना नाही तर, कपूर कुटुंबातील 'या' मुलीला तुम्ही ओळखता?

करिश्मा, करीना नाही तर, कपूर कुटुंबाच्या 'या' लेकीने वयाच्या 43 व्या घेतला मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 8:31 AM

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : कपूर कुटुंब बॉलिवूडमधील प्रतिष्ठित कुटुंबापैकी एक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कपूर कुटुंब बॉलिवूडवर राज्य करत आहे. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून राज कपूर, ऋषी कपूर, रणधीर कपूर यांच्यापर्यंत अनेक उत्तम अभिनेते कपूर कुटुंबाने बॉलिवूडला दिले. एवढंच नाही तर, 90 व्या दशकात अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर यांनी बॉलिवूडवर राज्य केलं, त्यानंतर आता अभिनेता रणबीर कपूर बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. पण आता कपूर कुटुंबाची आणखी एक मुलगी बॉलिवूड पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली असल्याची माहिती समोर येत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी कपूर कुटुंबाची लेक बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

सध्या ज्या कपूर कुटुंबाच्या लेकीची चर्चा रंगत आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून दिवंगत अभिनेते ऋषी कपूर आणि अभिनेत्री नीतू कपूर यांची मुलगी रिद्धीमा कपूर सहानी आहे. रिद्धीमा लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार असल्याची चर्चा रंगत आहे. पण याबद्दल कोणी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.

रिद्धीमा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडच्या अव्वल अभिनेत्रींना मागे ठेवेल असं रिद्धीमा हिचं सौंदर्य आहे. रिद्धीमा हिने कधीही बॉलिवूडमध्ये येण्याचा निर्णय घेतला नव्हता. पण आता ‘फॅबुलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स सीजन 3’ मध्ये रिद्धीमा मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत आहे.

रिद्धीमा एक प्रसिद्ध ज्वलरी डिझायनर आहे. रिद्धीमा हिचं लग्न उद्योगपती भरत सहानी यांच्यासोबत झालं आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. घरातल्या मुलींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं नाही… असा कपूर कुटुंबाचा नियम होता. याच नियमांचा पालन करत रिद्धीमा बॉलिवूडपासून दूर होती.

पण आता रिद्धीमा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे. रिद्धीमा अभिनेत्री नसली तरी, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. रिद्धीमा देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

रिद्धीमा सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. रिद्धीमा प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती कायम योगा किंवा वर्कआऊट करताना स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.