करीनाच्या ‘या’ मागणीमुळे भडकला करण जोहर, चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता, वर्षभर बोललाही नाही

करण जोहर आणि करीना कपूर खआन आज एकमेकांचे घनिष्ट मित्र आहेत, पण एक वेळ अशी आली होती जेव्हा दोघांचही जोरदार वाजलं होतं. करण इतका नाराज झाला होता की तो वर्षभर करीनाशी बोललाही नव्हता.

करीनाच्या 'या' मागणीमुळे भडकला करण जोहर, चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता, वर्षभर बोललाही नाही
या कारणामुळे करण-करीनाचा होता अबोला
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 4:55 PM

Kareena Kapoor Khan Karan Johar Rift : निर्माता-दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हे बॉलिवूडमधील चांगले मित्र मानले जातात. करीनाच्या गर्ल्स गँगमधील इतर मैत्रिणींचेह करणशी चांगले संबंध आहेत. ते सगळेच अनेकदा पार्टी आणि गेट टुगेदरमध्ये एकत्र दिसतात. करण आणि करीनामध्ये खूप चांगले बाँडिंग आहे. करणने करीनाच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. पण दोघांच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा दोघांनी एकमेकांचे तोंडही पाहिले नाही. त्यामागचं कारण जाणून तुम्ही देखील हैराण व्हाल. आपल्याला वाटतं पैसा फक्त सामान्य माणसांसाठी महत्वाचा असतो, सेलिब्रिटींना तर काहीच पडलेली नसते.त्यांच्याकडे तर खूप पैसे असतात. पण प्रत्यक्षात असं नसतं, खरी परिस्थिती वेगळीच असते.

करण – करीनाचं कशावरून वाजलं ?

करण जोहर आणि करीना यांच्यातील मतभेदाचे कारण पैसे होते. करणने त्याच्या ‘ ॲन अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रात या वादाचा उल्लेख केला आहे. 2003 मध्ये आलेल्या ‘कल हो ना हो’ चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान हा वाद झाला होता. 2002 साली करीना कपूर, हृतिक रोशन आणि राणी मुखर्जी यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मुझसे दोस्ती करोगे’ चित्रपट रिलीज झाला होता. मात्र बॉक्स ऑफीसवर त्याची जादू काही फार चालली नाही अन् तो चित्रपट फ्लॉप झाला. यामुळे करीना दु:खी होती.

चित्रपटाच्या पहिल्या वीकेंडला करण जोहरने करीना कपूरला फोन केला होता. करणने करिनाला ‘कल हो ना हो’ चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून काम करण्याची ऑफर दिली. पण शाहरुख खान इतके मानधन मिळाले तरच मी चित्रपटात काम करेन अशी अट करीनाने करण जोहरसमोर ठेवली होती. हे ऐकून करणला धक्काच बसला. त्यानेच करीनाला नकार दिला.

वडिलांच्या सांगण्यावरून करीनाला पुन्हा केला फोन

करीनाच्या अशा वागण्याने करण जोहरला खूप वाईट वाटले. कारण त्याचे वडील यश जोहर आणि तो स्वत: या चित्रपटाचे निर्माते होते. करिनाने या चित्रपटात काम करावे अशी यश जोहर यांची इच्छा होती. त्यामुळे वडिलांच्या सांगण्यावरून करणने पुन्हा करीनाला फोन केला, पण तेव्हाही करीनाने त्याचा फोन उचललाच नाही. करिनाचे हे वागणे पाहून रागवलेल्या करणने लगेच प्रिती झिंटाला चित्रपटाची ऑफर दिली. प्रीतीने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आणि त्यानंतरचा इतिहास सर्वांना माहीतच आहे. ‘कल हो ना हो’ हा चित्रपट खूप यशस्वी ठरला आणि त्याचे खूप कौतुकही झाले.

करण वर्षभर करीनाशी बोललाच नाही

करीनाच्या अशा वागण्यामुळे दुखावलेला करण जोहर पुढे जवळपास वर्षभर करीनाशी बोललाच नाही. दोघांनीही नऊ महिने एकमेकांचे तोंडही पाहिले नाही. मात्र काही काळानंतर यश जोहर यांची तब्येत बिघडली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी करीनाने संपर्क साधला. तेव्हा करण आणि करीनाने मतभेद दूर केले आणि ते एकमेकांशी पुन्हा बोलू लागले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.