Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Karan Johar | करण जोहरनं शेअर केला नवा व्हिडीओ, जुळ्या मुलांची मस्ती, रॅपीड फायर आणि गंमतीशीर किस्से

करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या दोन्ही मुलांचा मस्ती करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. करण जोहरनं रुही आणि यश या त्याच्या दोन जुळ्या मुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो मुलांसोबत रॅपीड फायर खेळताना दिसतोय. तर छोटे बहिण भाऊ बिस्टिकीट खाताना दिसतायेत. यादरम्यान करण जोहर आपल्या दोन मुलांना प्रश्न विचारतोय. गंमत म्हणजे करणच्या प्रश्नाचं उत्तर त्याची जुळी मुलं फिरवून देताना दिसतायेत.

Karan Johar | करण जोहरनं शेअर केला नवा व्हिडीओ, जुळ्या मुलांची मस्ती, रॅपीड फायर आणि गंमतीशीर किस्से
Follow us
| Updated on: Mar 06, 2022 | 11:18 AM

मुंबई : प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) नेहमी या न त्या कारणावरुन चर्चेत असतो. विशेष म्हणजे करण जोहर सोशल मीडीयावर चांगलाच सक्रीय दिसून येतोय. करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्यांच्या दोन्ही मुलांचा मस्ती करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. करण जोहरनं रुही आणि यश या त्याच्या दोन जुळ्या मुलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो मुलांसोबत रॅपीड फायर खेळताना दिसतोय. तर छोटे बहिण भाऊ बिस्टिकीट खाताना दिसतायेत. यादरम्यान करण जोहर आपल्या दोन मुलांना प्रश्न विचारतोय. गंमत म्हणजे करणच्या प्रश्नाचं उत्तर त्याची जुळी मुलं फिरवून देताना दिसतायेत. करणनं शनिवारी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आता करण म्हणलं की हसनं किंवा मजा घेणं आलंच. पण, या व्हिडीओमध्ये रूही (Roohi Johar) आणि यश (Yash Johar) फिरवून उत्तर देत असल्यानं चाहत्यांना हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा बघावा वाटतोय. हा गंमतीशीर व्हिडीओ पाहून तुम्हीही हसायला लागला.

जेव्हा करण प्रश्न विचारतो…

करण जोहर आपल्या मुलांना या नव्या व्हिडीतोत ज्या पद्धतीनं प्रश्न विचारत आहे. हे खूप विनोदी आहे. या व्हिडीओवरही मुलं देखील गंमतीशीर उत्तर देतायेत. करण यश आणि रुहीला चर्चा करतो आणि विचारतो तुमची सकाळ कशी आहे? या करणनं विचारलेल्या प्रश्नावर रुही उत्तर देताना म्हणते, छान आहे. तर करणचा मुलागा यश म्हणतो थोडं ढगाळ वातावरण आहे. यशच्या या उत्तरानंतर करण पुन्हा यशला प्रश्न करतो की, थोडं ढगाळ वातावरण का आहे? यश करणला उत्तर देताना म्हणतो, थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर करण म्हणतो तू खूप वाईट वेदर मॅन आहे. हा करण आणि त्याच्या मुलांमधला संवाद पाहून तुम्हालाही हसायला येईल. इतका गंमतीशीर व्हिडीओ आहे.

करणच्या उत्तरानं मुलांचा हशा

करण आणि त्याचा मुलगा यश आणि मुलगी रुही यांचा प्रश्न उत्तरांचा रंजक संवाद चाललेला असताना चांगलीच मज्जा येते. या संवादात रुही करणवर हसते. यानंतर करण रुहीला विचारतो, काय तुम्ही आम्हाला हवामानासंदर्भात सांगाल? यावर रुही करणला उत्तर देताना म्हणते, का नाही, बाहेर कडक ऊन आहे. हे ऐकूनच करण लगेच यशकडे पाहून म्हणतो, तुम्ही म्हणता कडक ऊन आहे, यश म्हणतो पाऊस येणार आहे. तुम्ही दोघेही काही कामाचे हवामान पत्रकार नाही. यावर दोन्ही मुलं जोरानं हसायला लागतात.

पाहा करणनं शेअर केलेला व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Karan Johar (@karanjohar)

अन् चाहत्यांची मनं जिंकली

करण आणि त्यांच्या मुलांच्या या व्हिडीओवर बॉलिवूडमधील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी करणच्या दोन्ही मुलांना क्यूट म्हणलं आहे. तर अनेकांनी स्मार्ट जनरेशन असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहे. याचवेळी रणवीर सिंह करणच्या व्हिडीओवर कौतुक करत हसला आहे. मनीष मल्होत्रा, नेहा भसीन, एकता कपूर यासह अनेकांना करणचा हा व्हिडीओ चांगलाच पसंत आलाय.

इतर बातम्या

‘जात.. जात नाही तोवर…’; नागराज मंजुळेंच्या ‘झुंड’वर टीका करणाऱ्यांना केदार शिंदेंचं सडेतोड उत्तर

Video: महामानव आणि महानायक एकाच फ्रेममध्ये हे फक्त तुच करु शकतोस, जितेंद्र जोशीचं LIVE सुरु अन नागराजची एन्ट्री झाली

Jhund : नागराज मंजुळेंचा ‘झूंड’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप? पहिल्या दिवशीची कमाई उघड, कौतूक होतंय तर मग प्रेक्षक का नाहीत?

'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी तपासात नेमकं काय म्हटलंय?.
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया.
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?
'अन् डाटा डिलीट', सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरची मोठी कबुली?.
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली
'मीच अपहरण केलं अन् हत्या..', सरपंच हत्या प्रकरणी आरोपींची मोठी कबुली.
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.