Karan Johar | जया बच्चन यांच्याबद्दल केला करण जोहर याने मोठा खुलासा, नेटकरीही हैराण
करण जोहर याचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच रिलीज झालाय. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केलीये. करण जोहर या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसला. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटात आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसली.
मुंबई : करण जोहर याचा काही दिवसांपूर्वीच रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये करण जोहर (Karan Johar) याची सर्वात आवडती अभिनेत्री अर्थात आलिया भट्ट ही दिसली. आलिया भट्ट हिच्यासोबत रणवीर सिंह देखील या चित्रपटात धमाका करताना दिसला. आता थिएटरनंतर हा चित्रपट (Movie) ओटीटीवर धमाका करण्यास तयार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील करण्यात आले. रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटाने बाॅक्स आॅफिसवर नक्कीच धमाल केलीये.
रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामध्ये आलिया भट्ट, रणवीर सिंह यांच्यासोबतच जया बच्चन या महत्वाच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसल्या. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांचे फोटो व्हायरल झाले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी या जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील जलसा बंगल्यावर भेटीसाठी आल्या. त्यावेळी जया बच्चनही उपस्थित होत्या.
रॉकी और रानी की प्रेम कहानी चित्रपटामध्ये जया बच्चन या एका रागीट आजीच्या भूमिकेत आहेत. लोक जया बच्चन यांना रिअल लाईफमध्येही फार रागीट समजतात. बऱ्याच वेळा पापाराझी यांच्यावर रागवताना जया बच्चन या दिसल्या. जया बच्चन यांचे बरेच भडकलेले व्हिडीओ कायमच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.
आता नुकताच करण जोहर याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये करण जोहर हा जया बच्चन यांच्याबद्दल मोठा खुलासा करताना दिसतोय. करण म्हणाला की, आमच्या सेटवर जर सर्वात अधिक धमाल करणाऱ्या व्यक्ती कोण असतील तर त्या जया बच्चन आहेत. त्यांच्याबद्दल चुकीचे बोलले जाते की, त्या रागीट आहेत. मात्र, तसे अजिबातच नाहीये.
सेटवर जया बच्चन या सर्वांच्या आवडतीच्या व्यक्ती आहेत. जया बच्चन चित्रपटाचही एका रागीट आजीच्या भूमिकेत आहेत. मात्र, त्या अजिबातच रागीट नाहीत. आता करण जोहर याचे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. कारण शक्यतो जया बच्चन यांच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्या रागात असतात.
करण जोहर याने रणवीर सिंह याच्याबद्दलही खुलासा केलाय. करण जोहर हा कायमच नेटकऱ्यांच्या निशाण्यावर दिसतो. करण जोहर आणि कंगना राणावत यांच्यामध्येही मोठा वाद आहे. कायमच कंगना राणावत हिच्या निशाण्यावर करण जोहर हा असतो. करण जोहर नेहमीच त्याच्या विधानांमुळे चर्चेत येतो.