करण जोहर ‘ब्रह्मास्त्र’मुळे करणार होता आत्महत्या? अंबानींनी दिलं 300 कोटींचं कर्ज; अभिनेत्याचा धक्कादायक दावा

'ब्रह्मास्त्र'ची कमाई पाहून दिवाळखोरीमुळे करण जोहर करणार होता आत्महत्या? अभिनेत्याचं ट्विट चर्चेत

करण जोहर 'ब्रह्मास्त्र'मुळे करणार होता आत्महत्या? अंबानींनी दिलं 300 कोटींचं कर्ज; अभिनेत्याचा धक्कादायक दावा
Karan Johar and Mukesh AmbaniImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 1:02 PM

मुंबई: अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटाची इंडस्ट्रीत जोरदार चर्चा झाली. बिग बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीही बऱ्याच अडचणींचा सामना केला. प्रदर्शनानंतर प्रेक्षक-समिक्षकांकडून ब्रह्मास्त्रला संमिश्र प्रतिसाद मिळाला. याच चित्रपटामुळे निर्माता करण जोहर दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर होता असा मोठा दावा एका अभिनेत्याने केला आहे. इतकंच नव्हे तर करण जोहर आत्महत्या करणार होता, असं धक्कादायक विधानही त्या अभिनेत्याने केला आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून कमाल आर खान आहे.

कमाल आर खान ऊर्फ केआरके नेहमीच त्याच्या वादग्रस्ट ट्विट्समुळे चर्चेत असतो. यावेळी ट्विट करत त्याने करण जोहर आणि ब्रह्मास्त्र चित्रपटाविषयी धक्कादायक दावा केला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ब्रह्मास्त्रची कमाई फारशी न झाल्याने निर्माता करण जोहरने आत्महत्या करण्याचा ड्रामा केला, असं केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय. इतकंच नव्हे तर मुकेश अंबानी यांनी करणला 300 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचंही त्याने म्हटलंय.

हे सुद्धा वाचा

केआरकेनं करण जोहर आणि ब्रह्मास्त्रच्या कलेक्शनबद्दल ट्विट करत लिहिलं, ‘सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वेळेपूर्वी करण जोहरने त्याच्या घरी आत्महत्येचा ड्रामा केला होता. ज्यामागचं कारण होतं ब्रह्मास्त्रमुळे झालेलं मोठं नुकसान. नंतर मुकेश अंबानी यांनी त्याला 300 कोटी रुपयांचं कर्ज दिलं. आता प्रश्न हा आहे की करण जोहर जगाला स्पष्टपणे सांगत का नाही की ब्रह्मास्त्रमुळे तो दिवाळीखोरीच्या उंबरठ्यावर आहे.’

केआरकेनं याआधीही अनेकदा करण आणि ब्रह्मास्त्रवरून ट्विट्स केले होते. ब्रह्मास्त्रच्या कमाईबाबत त्याने याआधीही प्रश्न उपस्थित केले आहेत. रणबीर-आलियाच्या या चित्रपटाचं खोटं बॉक्स ऑफिस कलेक्शन दाखवल्याचा आरोप केआरकेनं केला आहे. प्रेक्षक चित्रपट पाहायला जातील यासाठी त्याची कमाई अधिक दाखवण्यात आली, असं तो म्हणाला होता.

दुसरीकडे चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते ब्रह्मास्त्रने जगभरात 430 कोटी रुपयांहून अधिक गल्ला जमवला. या चित्रपटाचं बजेट 300 ते 400 कोटींमध्ये असल्याचं म्हटलं गेलं. अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात रणबीर, आलियासोबतच अमिताभ बच्चन, शाहरुख खान, मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्याही भूमिका होत्या.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.