बिग बॉसची नाती कुठे टिकतात? करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश ही सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. हे दोघं लग्न कधी करणार, याची प्रतीक्षा चाहते आतुरतेने करत आहेत. मात्र चाहत्यांना सोशल मीडियावरील एक पोस्ट वाचून आश्चर्याचा धक्का बसला आहे.
‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमध्ये आजवर अनेक जोड्या बनल्या आणि बिघडल्यासुद्धा. यापैकी काही जणांनी त्यांच्या नात्याला पुढपर्यंत नेत लग्न केलं, तर काहीजणांचा त्यापूर्वीच ब्रेकअप झाला. ‘बिग बॉस’मध्ये बनणाऱ्या नात्यांविषयी लोक नेहमी असंच म्हणतात की हे सर्व फक्त दिखाव्यासाठी केलं जातं. काही नात्यांविषयी आधीच अंदाज वर्तवला जातो की हे फार काळ टिकणारं नाही. अशातच ‘बिग बॉस’ची सर्वांत लोकप्रिय जोडी त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली आहे. ही जोडी दुसरी-तिसरी कोणती नसून तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची आहे. ही जोडी इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. चाहते तेजस्वी-करणच्या लग्नाच्या बातमीची प्रतीक्षा करत होते, मात्र त्यापूर्वीच त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाल्याचं समजतंय.
टीव्ही अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची भेट ‘बिग बॉस 15’च्या सेटवर झाली. याच शोदरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि शो संपल्यानंतरही त्यांचं नातं कायम होतं. या दोघांमधील केमिस्ट्री कमालीची होती आणि रिल-रिअल लाइफमध्ये ती सहज झळकून यायची. मात्र आता या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं कळतंय. ‘रेडीट’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये असा दावा केला जातोय की तेजस्वी आणि करणने ब्रेकअपचा निर्णय घेतला आहे.
Is this the end of one more BB ship? #Tejran pic.twitter.com/o4PG6qann4
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) June 15, 2024
या पोस्टच्या मते तेजस्वी आणि करणच्या नात्यात गेल्या काही काळापासून तणाव पहायला मिळतोय. तेजस्वीला करणच्या मैत्रिणींशी समस्या असल्याचं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे करण त्याच्या नात्यात कंटाळल्यामुळे आधीपासूनच बदनाम आहे. या दोघांना त्यांच्या ब्रेकअपची माहिती सोशल मीडियाद्वारे जाहीर करायची नाही, कारण त्यांना त्यावरून अधिक चर्चा नकोय आहे, असंही पोस्टमध्ये म्हटलं गेलंय. म्हणूनच करण आणि तेजस्वीकडून अद्याप त्याविषयी कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. करण आणि तेजस्वीच्या ब्रेकअपबद्दलची पोस्ट वाचून त्यावर नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. बिग बॉसमध्ये बनलेल्या जोडीवर त्यांनी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे.