‘माझ्या आयुष्यात चाललेल्या बकवासाबद्दल…’, घटस्फोटावर करण ग्रोवरचं धक्कादायक वक्तव्य
Karan Grover | माझ्या आयुष्यात चाललेल्या बकवासाबद्दल... अनेक वर्षांनंतर करण ग्रोवर याने घटस्फोटावर केलं धक्कादायक वक्तव्य..., श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्याने बिपाशा हिच्यासोबत थाटला तिसरा संसार
अभिनेता करण सिंग ग्रोवर याने 2016 मध्ये अभिनेत्री बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. बिपाशा – करण यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव देवी असं आहे. सांगायचं झालं तर, बिपाशा हिच्यासोबत करण याचं तिसरं लग्न आहे. बिपाशा हिच्यासोबतलग्ना आधी करण याचं पहिलं लग्न श्रद्धा निगम आणि दुसरं लग्न जेनिफर विंगेट हिच्यासोबत झालं होतं. पण अभिनेत्याची पहिली दोन लग्न अपयशी ठरली.
दरम्यान, तिसऱ्या लग्नानंतर देखील अभिनेत्याने कधीच पहिल्या दोन लग्नाबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्याने भूतकाळाबद्दल मौन सोडलं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत करण ग्रोवर याने मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करण याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
करण म्हणाला, ‘ब्रेकअप किंवा घटस्फोट दोन्ही गोष्टी चांगल्या नाहीत. काही दिवसांनंतर प्रत्येक जण आयुष्यात पुढे जातो. जे काही झालं ते चांगलं झालं… याचा अनुभव येतो. माझ्या आयुष्यात चाललेल्या बकवासाबद्दल मला कोणाशीही बोलण्याची गरज कधीच वाटली नाही…’
‘मला सर्वत्र आनंद पसरवायचा आहे. प्रत्येकाला स्वतःच्या विकृतीला सामोरे जावे लागते आणि मला वाटते की प्रत्येकजण त्यांच्या विकृतीला सामोरे जाण्यासाठी अशा प्रकारच्या गोपनीयतेस पात्र आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.
करण ग्रोवर याने टीव्ही अभिनेत्री श्रद्धा ग्रोवर हिच्यासोबत 2008 मध्ये लग्न केलं. पण देघांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या एक वर्षानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर 2012 मध्ये अभिनेत्याने जेनिफर विंगेट सोबत लग्न केलं.
जेनिफर विंगेट हिच्यासोबत देखील अभिनेत्याचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2014 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या घटस्फोटानंतर अभिनेत्याने बिपाशा बासू हिच्यासोबत लग्न केलं. आता करण – बिपाशा एकमेकांसोबत आनंदी विवाहित आयुष्य जगत आहेत.
जेनिफर विंगेट हिने देखील घटस्फोटवर मौन सोडलं होतं.
मालिकाच्या सेटवरच जेनिफर आणि करण सिंग ग्रोव्हर यांची भेट झाली. भेटीचं रुपांतर प्रेमात झालं आणि 2012 मध्ये जेनिफर आणि करण यांनी लग्न केलं. मात्र, दोघांचं नातं फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. काही दिवसांपूर्वी अनेक वर्षांनंतर जेनिफरने करण सिंग ग्रोव्हरसोबत घटस्फोटावर मौन सोडले. यात कोणाचाही दोष नाही, असं अभिनेत्री म्हणाली होती.