करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांना अटक; मॉडेलकडून विनयभंगाचा आरोप
सुरजित सिंह राठोड यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर एका मॉडेलने विनयभंगाचा आरोप केला आहे. सुरजित सिंह राठोड हे करणी सेनेचे अध्यक्ष असून चित्रपट निर्माते आहेत.
मुंबई : चित्रपट निर्माते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांना मुंबई येथील बांगुर नगर पोलिसांनी अटक केली आहे. सुरजित सिंह राठोड यांच्यावर एका मॉडेलने विनयभंग आणि मारहाणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. मॉडेलने FIR दाखल केल्यानंतर पोलिसांनी करणी सेनेचे अध्यक्ष सुरजित सिंह राठोड यांच्यावर कारवाई केली आहे. सुरजित सिंह राठोड हे करणी सेनेचे अध्यक्ष असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सध्या याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मॉडेलने केलेल्या आरोपांनंतर याप्रकरणी अधीक तपास सुरु आहे. सुरजित सिंह राठोड सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. एवढंच नाही तर, त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर करणी सेनेची बाजू मांडली आहे. सुरजित सिंह राठोड कायम त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात.
सुरजित सिंह राठोड यांच्यावर मॉडेलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर पोलीस चौकशी करत आहेत. सुरजित सिंह राठोड कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पण आता मॉडेलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर सुरजित सिंह राठोड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
दरम्यान काही दिवसांपूर्वी सुरजित सिंह राठोड चर्चेत आले होते, जेव्हा सुरजित यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर थेट अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यावर निशाणा साधला होता. सुरजित सिंह राठोड यांच्या मते, सुशांत याच्या आत्महत्येपूर्वी रियाने अभिनेत्यासोबत संवाद साधला होता.
एवढंच नाही तर, सुरजित सिंह राठोड म्हणाले, जेव्हा सुशांतच्या शवविच्छेदना दरम्यान रिया त्याठिकाणी आली होती, तेव्हा रियाने सुशांतला सॉरी बाबू असं म्हटलं होतं. यानंतर रिया वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सुरजित कायम नवे-नवे दावे करत होते. पण आता मॉडेलने केलेल्या गंभीर आरोपांनंतर सुरजित सिंह राठोड वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.