‘तुला अधिकार नाहीत…’ करिना कपूर सावत्र मुलाबद्दल असं का म्हणाली?
Kareena Kapoor | सावत्र मुलाबद्दल करीना कपूर हिने वापरलेले शब्द तुफान चर्चेत... 'तुला अधिकार नाहीत...', असं का म्हणाली करीना कपूर? इब्राहिम अली खान याने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केल्यानंतर असं का म्हणाली करीना कपूर?
अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांना दोन मुलं आहे. दोघांच्या मुलीचं नाव सारा अली खान असं आहे. सारा एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सारा कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत आली आहे. पण आता सारा नाहीतर, इब्राहिम चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी इब्राहिम अली खान याने देखील इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. आता इब्राहिम याने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
इब्राहिम अली खान फ्लोरिडातील मियामी ग्रांप्रीमध्ये सहभागी झाला होता. जिथे त्याची भेट रेसर चार्ल्स लेक्लेर्कशी झाली. या भेटीचा एक फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सध्या सर्वत्र इब्राहिम याच्या फोटोची चर्चा रंगली आहे. फोटोवर करीना हिने देखील प्रतिक्रिया दिली आहे.
View this post on Instagram
चार्ल्स याच्यासोबत फोटो पोस्ट करत इब्राहिम याने कॅप्शनमध्ये, ‘मला माहिती आहे… चार्ल्स याने देखील मला फेरारी ड्रायव्हर समजलं असेल…’ असं लिहिलं आहे. इब्राहिम याच्या फोटोवर फक्त चाहते नाही तर, सेलिब्रिटी देखील कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. करीना हिने देखील सावत्र मुलाच्या पोस्टवर कमेंट केली आहे.
करीना सावत्र मुलगा इब्राहीम याच्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली, ‘तू किती हँडसम आहेस हे सांगण्याचा तुला काहीही अधिकार नाही…’ करीना हिच्या कमेंटने देखील चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. सांगायचं झालं तर, करीना, इब्राहिम आणि सारा यांच्यामध्ये देखील चांगलं संबंध आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.
कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी आणि सणांच्या दिवशी देखील सारा आणि इब्राहिम वडिलांच्या घरी येतात. करीना हिच्या मुलांसोबत देखील सारा, इब्राहिम यांचे फोटो व्हायरल होत असतात. सारा अली खान, इब्राहिम अली खान, तैमूर अली खान, जेह अली खान यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
पलक तिवारी हिच्या इब्राहिम याचं नातं
अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी आणि अभिनेता सैफ अली खान याचा मुलगा इब्राहिम अली खान रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी गेल्या कित्येक दिवसांपासून जोर धरला आहे. अनेक ठिकाणी दोघांना स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांनी देखील त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण चाहत्यांना दोघांची जोडी प्रचंड आवडते.