Kareena Kapoor: कोणता धर्म मानते करीना कपूर? तैमूरच्या नॅनीकडून मोठं सत्य समोर

Kareena Kapoor Khan : करीना कपूरच्या घरात कसं असतं वातावरण, कोणता धर्म मानते बेबो? तैमूरसाठी कोणतं भजन लावून ठेवते घरात..., तैमूरच्या नॅनीकडून मोठं सत्य समोर, करीना कपूर कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे असते चर्चेत...

Kareena Kapoor: कोणता  धर्म मानते करीना कपूर? तैमूरच्या नॅनीकडून मोठं सत्य समोर
Follow us
| Updated on: Jul 30, 2024 | 11:59 AM

अभिनेत्री करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या वक्तव्यांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे…. करीना कपूर हिच्याप्रमाणे बेबोचा मुलगा तैमूर अली खान याची लोकप्रियता देखील फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील तैमूर याचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. तैमूर आणि जेह यांची काळजी घेण्याची जबाबदारी नॅनी ललिता डिसिल्वा याांच्यावर असल्यामुळे ललिता यांना देखील स्टारडम प्राप्त झालं आहे. ललिता यांच्यासोबत तैमूर आणि जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत, नॅनी ललिता डिसिल्वा यांनी करीना कपूर आणि तिच्या घरातील अनेक गोष्टींबद्दल मोठी माहिती दिली आहे. शिवाय करीना कोणत्या धर्माचं पालन करते यावर देखील ललिता डिसिल्वा यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र ललिता डिसिल्वा यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

हे सुद्धा वाचा

ललिता डिसिल्वा करीना हिच्याबद्दल म्हणाल्या, ‘करीना कपूर तिच्या मुलांची प्रचंड प्रेमळ आई आहे. ती कायम घरात शिस्त पाळते. ही सवय करीना हिला तिची आई बबिता कपूर यांच्याकडून मिळाली आहे. कारण बबिता देखील कायम शिस्त पाळतात…’

करीना कोणत्या धर्माला मानते, यावर ललिता म्हणाल्या, ‘करीना हिचा जन्म हिंदू कुटुंबात झाला, तर बेबोने मुस्लीम कुटुंबात लग्न केलं आहे. पण करीना दोन्ही धर्मांना मानत नाही. करीना ख्रिश्चन धर्माचा पालन करते. तर तैमूरसाठी घरात वह ‘इक ओंकार’ भजन लावून ठेवते. मुलांनी कायम सकारात्मक वादावरणात राहावं… यासाठी करीना कायम प्रयत्न करत असते.’ असं देखील ललिता म्हणाल्या.

सैफ अली खान – करीना कपूर 

सैफ अली खान – करीना कपूर यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. करीना ही सैफ अली खान याची दुसरी पत्नी आहे. करीना कायम सोशल मीडियावर पती आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. करीना हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.