Kareena Kapoor | सैफशी आंतरधर्मीय लग्नाबद्दल पहिल्यांदाच करीना व्यक्त; म्हणाली “तो कोणता धर्म पाळतो..”

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी 2012 मध्ये लग्न केलं. त्यावेळी या दोघांच्या वयातील अंतरावरून बरीच चर्चा झाली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीनाने वयातील अंतरावर आणि आंतरधर्मीय लग्नावर प्रतिक्रिया दिली आहे.

Kareena Kapoor | सैफशी आंतरधर्मीय लग्नाबद्दल पहिल्यांदाच करीना व्यक्त; म्हणाली तो कोणता धर्म पाळतो..
Saif Ali Khan and Kareena Kapoor Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 12, 2023 | 9:08 AM

मुंबई | 12 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांनी ऑक्टोबर 2012 मध्ये लग्न केलं. या दोघांच्या वयात दहा वर्षांचं अंतर आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करीना या अंतरावर आणि सैफसोबतच्या आंतरधर्मीय लग्नावर मोकळेपणे व्यक्त झाली. “लोक आंतरधर्मीय लग्नाच्या विषयावर चर्चा करण्यात खूप वेळ वाया घालवतात. खरंतर ही गोष्ट तेवढी मोठी नाहीच”, असं करीना म्हणाली. वयातील दहा वर्षांच्या अंतरावरून ट्रोल करणाऱ्यांनाही करीनाने सडेतोड उत्तर दिलं.

“वयामुळे कधीपासून फरक पडू लागला? तो तर आजही आधीपेक्षा खूप हॉट आहे. मी दहा वर्षांनी लहान आहे, याचा मला आनंद आहे. त्याने चिंता करायला हवी. तो 53 वर्षांचा झाला, असं कोणीच म्हणत नाही. वयातील अंतरामुळे काही फरक पडत नाही. नात्यातील एकमेकांविषयीचा आदर, प्रेम आणि एकमेकांचा सहवास किती एंजॉय करतो ते महत्त्वाचं असतं”, असं करीना म्हणाली.

हे सुद्धा वाचा

“आपण आंतरधर्मीय नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल चर्चा करण्यावर खूप ऊर्जा वाया घालवतो. पण एकमेकांच्या सहवासाचा आनंद लुटता आला पाहिजे, हेच महत्त्वाचं असतं. सैफ आणि माझ्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला एकमेकांचा सहवास आवडतो. त्यामुळे तो कोणता धर्म पाळतो किंवा त्याचं वय काय आहे, या गोष्टींनी मला फरक पडत नाही. त्या गोष्टींची चर्चाही व्हायला नाही पाहिजे”, अशा शब्दांत करीना व्यक्त झाली.

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी ‘एजंट विनोद’, ‘टशन’ आणि ‘ओमकारा’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. एका मुलाखतीदरम्यान करीनाने खुलासा केला होता की, “जेव्हा आम्ही दोघं ओमकारा चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा आमच्यात कोणतंही संभाषण झालं नव्हतं आणि आम्ही दोघं त्यावेळी दुसऱ्या कोणाशी तरी रिलेशनशिपमध्ये होतो.”

सैफ आणि करीना ‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल केली नाही, पण ‘सैफिना’च्या प्रेमाची जाणीव सर्वांना झाली होती. करीनाने स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या असलेल्या सैफशी लग्न करण्यासाठी घरातून पळून जाण्याचा प्लॅन बनवला होता. करीना एका मुलाखतीत म्हणाली होती, “आम्ही आमच्या प्रायव्हसीबद्दल खूप चिंतित झालो आणि आमच्या कुटुंबाला धमकीही दिली, जर आमचे लग्न मीडिया सर्कस बनले तर आम्ही घरातून पळून जाऊ.”

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.