Kareena Kapoor Khan हिचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे, बेबो का लपवते स्वतःची ओळख?
करीनाचं खरं नाव तुम्हाला माहिती आहे? 'या' एका कारणामुळे बेबो लपवते स्वतःची खरी ओळख? सध्या सर्वत्र करीना कपूर खान हिच्या नावाची सर्वत्र चर्चा...
मुंबई : अभिनेत्री करीना कपूर खान हिला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक म्हणजे अभिनेत्री करीना कपूर खान… करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. करीनाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते… करीनाला बॉलिवूडमध्ये बेबो म्हणून देखील ओळखतात. पण करीनाचं खरं नाव अभिनेत्रीच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे.. पण अभिनेत्रीला स्वतःचं नाव का बदलावं लागलं यामागे देखील एक मोठं कारण आहे… आज ज्या अभिनेत्रीला चाहते करीना कपूर खान म्हणून ओळखतात तिचं खरं नाव सिद्धिमा कपूर असं होतं…
अभिनेत्रीच्या फार कमी चाहत्यांना माहिती आहे की करीनाचं खरं नाव सिद्धिमा कपूर असं होतं.. सांगायचं झालं तर, करीनाच्या जन्माच्या सहा दिवसांनंतर अभिनेत्रीची चुलत बहीण आणि ऋषी कपूर – नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर हिचा जन्म झाला होता. जेव्हा दोघी बहिणींचा जन्म झाला होता. तेव्हा देशात गणेश उत्सवाची धामधूम होती…
गणपतींच्या दोन पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांचं नाव लक्षात घेत आजोबा राज कपूर यांनी रिद्धिमा आणि करीनाचं नाव सिद्धिमा ठेवलं. ऋषी कपूर – नीतू कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव रिद्धिमा राहू दिलं. पण बबीता आणि रणधीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचं नाव बदलून करीना ठेवलं..
एवढंच नाही तर, बबीता जेव्हा गरोदर होत्या. तेव्हा त्या ‘अन्ना कारेनिना’ हे पुस्तक वाचत होत्या. म्हणून पुस्तकाच्या शिर्षकावरून अभिनेत्रीचं नाव करीना ठेवण्यात आलं.. करीनाचं नीक नेम देखील रणधीर कपूर यांनी ठेवलं असल्याचं अनेकदा समोर आलं. करीनाचं नीक नेम बेबो आहे, तर करीनाची मोठी बहिण करिश्मा हिचं नीक नेम लोलो असं आहे…
करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. करीनाने जेव्हा अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलं, तेव्हा देखील अभिनेत्री तुफान चर्चेत आली. होत असलेल्या विरोधाला अधिक महत्त्व न देता अभिनेत्रीने २०१२ मध्ये सैफसोबत लग्न केलं.
लग्नानंतर करीनाने २०१६ मध्ये तैमूर अली खान आणि २०२१ मध्ये दुसरा मुलगा जहांगीर याला जन्म दिला. अभिनेत्री कायम तिच्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.