Kareena Kapoor हिचं सावत्र मुलांसोबत कसं आहे नातं? एका फोटोमुळे सत्य समोर

सारा अली खाण आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत कसं बेबोचं नात? सावत्र मुलांबद्दल करीना कपूर म्हणाली, 'मला कळत नाही लोकं याबद्दल का चर्चा करतात...'

Kareena Kapoor हिचं सावत्र मुलांसोबत कसं आहे नातं? एका फोटोमुळे सत्य समोर
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 3:28 PM

मुंबई : सेलिब्रिटी कायम त्यांच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अभिनेत्री करीना कपूर देखील कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. एवढंच नाही तर, तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय करीना देखील पती सैफ अली खान आणि मुलं तैमूर, जेह यांच्यासोबत फोटो पोस्ट करत असते. करीना ही सैफची दुसरी पत्नी आहे. सैफचं पहिलं लग्न अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत झालं होतं. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलीचं नाव सारा अली खान असं असून मुलाचं नाव इब्राहिम अली खान असं आहे. पण लग्नाच्या काही वर्षांनंतर सैफ आणि अमृता यांच्यामध्ये वाद सुरु झाले. अखेर दोघांनी २००४ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

तर करीना हिचं सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत नातं कसं आहे? याबद्दल अनेकदा विचारण्यात आलं. एका मुलाखतीत अमृता करीना हिच्याबद्दल म्हणाली, ‘सारा करीनाची चाहती आहे. अभिनयाबद्दल देखील सारा करीना हिच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेते.’ दरम्यान, दिग्दर्शक करण जोहर याच्या ‘कॉफी विद करण सीजन 7’ मध्ये करण याने करीनाला सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत असलेल्या नात्याबद्दल विचारलं होतं.

हे सुद्धा वाचा

करणच्या प्रश्नाचं उत्तर देत बेबो म्हणाली, ‘मला कळत नाही, मला लोक सतत याविषयी का विचारतात… अम्ही एक कुटुंब आहोत…सैफ, सारा, इब्राहिम एकत्र वेळ व्यतीत करतात. यामध्ये मला वाईट वाटेल असं काहीही नाही…’ सारा अली खान आणि इब्राहिम अली खान यांच्यासोबत करीनाचं नातं खास आहे. सारा आणि इब्राहिम यांना अनेकदा करीनासोबत स्पॉट करण्यात आलं. खान कुटुंबाच्या कोणत्याही कार्यक्रमात अमृता उपस्थित राहत नसली तरी, सारा आणि इब्राहिम सैफ आणि करीना यांच्यासोबत असतात.

सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. घटस्फोट झाल्यानंतर अभिनेत्री सारा आणि इब्राहिम यांच्यासोबत नव्या घरात शिफ्ट झाली. त्यानंतर सैफ आणि करीना यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला. दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर सैफ आणि करीना यांनी २०१२ साली लग्न केलं.

सैफ आणि करीना यांच्या दोन मुलांसोबत देखील सारा – इब्राहिम यांचं खास नातं आहे. सारा, इब्राहिम, तैमूर, जेह यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.