Kareena Kapoor | क्षणार्धात हातातील पत्ते गायब; जादू पाहून सैफ-करीनाला आश्चर्याचा धक्का! पहा व्हिडीओ

अभिनेत्री करीना कपूरने नुकताच तिचा 43 वा वाढदिवस साजरा केला. हरयाणातील पतौडी पॅलेसमध्ये तिच्या वाढदिवसाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये जादूगार करण खन्नालाही बोलावलं होतं. करणने करीना आणि सैफसमोर मॅजिक ट्रिक दाखवली. ही ट्रिक पाहून दोघं थक्क झाले.

Kareena Kapoor | क्षणार्धात हातातील पत्ते गायब; जादू पाहून सैफ-करीनाला आश्चर्याचा धक्का! पहा व्हिडीओ
Kareena Kapoor and Saif Ali KhanImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 9:15 AM

मुंबई | 25 सप्टेंबर 2023 : अभिनेत्री करीना कपूरने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. पतौडी पॅलेसमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसोबत तिने हा वाढदिवस साजरा केला. त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्टीत जादूगारलाही बोलावलं होतं. प्रसिद्ध मेंटलिस्ट आणि इल्युशनिस्ट करण खन्नाला या पार्टीत आमंत्रित करण्यात आलं होतं. करणने यावेळी करीना आणि सैफसमोर जादू करून दाखवली. त्याचे मॅजिक ट्रिक्स पाहून दोघं थक्क झाले. या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. करणने त्याच्याही सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओमध्ये करण दोघांचे हात आपल्या हातात घेतो. करीना आणि सैफच्या हातात तो आधी दोन पत्ते देतो. त्याचवेळी छोटा मुलगा जेह तिथे येतो. करीना त्याला बाजूला जायला सांगते. करण त्याच्या ट्रिक्सने करीना आणि सैफच्या हातातील पत्ते क्षणार्धात गायब करतो. काही सेकंदांपूर्वी आपल्या हातात तिने पत्ते गायब झाल्याचं पाहून करीना आणि सैफ थक्क होतात. या दोघांच्या चेहऱ्यावरील आश्चर्यकारक भाव या व्हिडीओत स्पष्ट पहायला मिळत आहेत. ‘हे खूपच भीतीदायक आहे’, असंही करीना त्याला म्हणते.

हे सुद्धा वाचा

सैफसुद्धा करणच्या मॅजिकचं कौतुक करतो. करीनाची बहीण करिश्मा कपूर या मॅजिक ट्रिकचा व्हिडीओ शूट करताना दिसून येते. तर पुढील मॅजिक पाहण्यासाठी करिना तैमुरला प्रोत्साहित करते. करीनाने तिचा 43 वा वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. हरयाणामधील ‘पतौडी पॅलेस’मध्ये कपूर आणि खान कुटुंबीय पार्टीसाठी जमले होते. करीनाच्या बर्थडे केकवर ‘आमची जाने जान, हॅपी बर्थडे’ असा संदेश लिहिण्यात आला होता. करीनाचा ‘जाने जान’ हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.

जाने जान या चित्रपटाच्या माध्यमातून करीनाने ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. यामध्ये तिच्यासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सुजॉय घोषने दिग्दर्शित केलेला हा क्राइम थ्रिलर चित्रपट आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.