Taimur Ali Khan | ‘ती स्वत: तैमुरएवढी असून…’; नॅनीचा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलिंगला सुरुवात

तैमूर लहानपणापासूनच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. काही वेळा तैमूुरसुद्धा यावर नाराज दिसला. अनेकदा तो पापाराझींसमोरही चिडचिड करताना दिसला. सैफ आणि करीनासुद्धा मुलाच्या अशाप्रकारे चर्चेत येण्यामुळे त्रस्त झाले होते.

Taimur Ali Khan | 'ती स्वत: तैमुरएवढी असून...'; नॅनीचा व्हिडीओ व्हायरल होताच ट्रोलिंगला सुरुवात
सैफ अली खान, करीना कपूर, तैमुर अली खानImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 3:01 PM

मुंबई : अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर अली खान हा इंडस्ट्रीतील सर्वाधिक चर्चेत असलेला स्टारकिड आहे. अगदी त्याच्या नावावरूनही मोठा वाद झाला होता. तैमुरचे फोटो आणि व्हिडीओ क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल होतात. नुकताच त्याचा एक व्हिडीओ पापाराझींनी शूट केला असून त्याकडे नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं गेलंय. तैमुर त्याच्या नॅनीसोबत होता आणि त्याचा हा व्हिडीओ पाहून काही नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये तैमुरची नॅनी त्याला उचलून घेऊन चालताना दिसत आहे. यावरूनच नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. ‘ती बिचारी स्वत: तैमुरइतकी आहे, हा सहा वर्षांचा मुलगा चालू शकत नाही का’, असं एकाने लिहिलं आहे. तर ‘बारीक मुलगी एवढ्या मोठ्या तैमुरला उचलून घेऊन चालतेय’, असं दुसऱ्याने म्हटलंय. काहींनी तैमुरची बाजू घेत पापाराझींनाही ट्रोल केलंय. ‘तो अजूनही लहान आहे, त्यात काही चुकीचं नाही’, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

करीनाने 16 ऑक्टोबर 2012 रोजी सैफ अली खानशी लग्न केलं. त्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये तिने तैमुरला जन्म दिला. 2021 मध्ये करीनाने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. जहांगीर ऊर्फ जेह असं तिच्या दुसऱ्या मुलाचं नाव आहे. करीना आणि सैफने हा निर्णय घेतला होता की ते त्यांच्या दुसऱ्या मुलाला मीडियापासून दूर ठेवतील. ते आपल्या दुसऱ्या मुलाचा चेहरा माध्यमांसमोर दाखवणार नाही किंवा मुलाला मीडियासमोर आणणार नाहीत. तैमुरच्या काळात झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी असं ठरवलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांनी जेहचे फोटो आणि व्हिडीओ प्रसिद्ध केले.

तैमूर लहानपणापासूनच माध्यमांमध्ये चर्चेत आहे. काही वेळा तैमूुरसुद्धा यावर नाराज दिसला. अनेकदा तो पापाराझींसमोरही चिडचिड करताना दिसला. सैफ आणि करीनासुद्धा मुलाच्या अशाप्रकारे चर्चेत येण्यामुळे त्रस्त झाले होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.