‘ओमकारा’ सिनेमानंतर Kareena Kapoor हिला नव्हतं करायचं अजय देवगणला किस; कारण…

'ओमकारा'मध्ये करीना - अजय यांचे इंटिमेट सीन, पण 'या' सिनेमसाठी बबोने अभिनेत्याला किस करण्यासाठी का दिला नकार? फक्त अजय नाही तर, या अभिनेत्यासोबत किसिंग सीन करण्यास अभिनेत्रीचा नकार

'ओमकारा' सिनेमानंतर Kareena Kapoor हिला नव्हतं करायचं अजय देवगणला किस; कारण...
Follow us
| Updated on: Apr 03, 2023 | 11:32 AM

मुंबई : बॉलिवूड सिनेमांमध्ये अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन असतात. पण इंटिमेट सीन शूट करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेतली जाते. झगमगत्या विश्वात कलाकारांसाठी इंटिमेट सीन शूट करणं फार कठीण असतं. सिनेमाच्या कथेत इंटिमेट सीनची गरज असल्यामुळे अनेक कलाकार सिनेमा करण्यास नकार देतात. ज्यामुळे दिग्दर्शक आणि लेखकांना कथेत महत्त्वाचे बदल करावे लागतात. अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत देखील असंच काही झालं आहे. एक वेळ अशी आली जेव्हा करीनाने अभिनेता अजय देवगण याला ऑनस्क्रिन किस करण्यास नकार दिला. अजय सोबत बेबोने अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्याग्रह’ सिनेमात अजय सोबत किसिंग सीन देण्यास करीनाने नकार दिला.

करीना कपूर आणि अजय देवगण स्टारर ‘ओमकारा’ (Omkara) सिनेमा आज प्रत्येकाला आठवत असेल. ‘ओमकारा’ सिनेमात दोघांचे इंटिमेट सीन देखील होते. पण विशाल भारद्वाज यांच्या ‘ओमकारा’ सिनेमानंतर प्रकाश झा यांच्या ‘सत्याग्रह’ सिनेमात इंटिमेट सीन करण्यास अभिनेत्रीचा नकार होता. ‘सत्याग्रह’ सिनेमात अजयसोबत ‘किसिंग सीन’ करणं अभिनेत्रीला योग्य वाटत नव्हतं म्हणून तिने नकार दिला.

करीनाने अजय याच्यासोबत ‘ओमकारा’ सिनेमाशिवाय ‘सिंघम’ आणि ‘गोलमाल’ या सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘ओमकारा’ सिनेमात इंटिमेट सीन करण्यास अभिनेत्रीचा हरकत नव्हती, पण १६ ऑक्टोबर २०१२ साला अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर करीनाने किसिंग आणि इंटिमेट सीन करण्यास नकार दिला.

ajay devgan

सैफ अली खान याच्यासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांत ‘सत्याग्रह’ सिनेमाची शुटिंग सुरु होणार होती. करीना आणि अजय एका गाण्यात लिपलॉक करायचं होतं. अशात लग्न झाल्यानंतर अजयसोबत किसिंग सीन करण्यात अभिनेत्री संकोचल्या सारखं वाटत होतं. त्यामुळे प्रकाश झा यांना सिनेमात महत्त्वाचे बदल करावे लागले. याआधी अभिनेता इमरान हाशमी याच्यासोबत ‘बदतमीज दिल’सिनेमात देखीस किसिंग सीन करण्यास नकार दिला होता.

अभिनेत्री करीना कपूर आज पती आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. करीना कायम पती सैफ अली खान आणि मुलं तैमूर आणि जेह यांच्यासोबत फोटो शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

Kareena kapoor

करीना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.