Ajay Devgan याच्यासोबतच ‘या’ श्रीमंत व्यक्तीला डेट करत होती करिश्मा कपूर? नंतर झालं असं की….

संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी करिष्माने केलं आहे अनेक सेलिब्रिटींना डेट; 'या' श्रीमंत व्यक्तीसोबत अभिनेत्रीच्या नावाची चर्चा रंगू लागली आणि...

Ajay Devgan याच्यासोबतच 'या' श्रीमंत व्यक्तीला डेट करत होती करिश्मा कपूर? नंतर झालं असं की....
Follow us
| Updated on: Apr 02, 2023 | 2:00 PM

मुंबई : एक काळ असा होता जेव्हा काजोल, अजय देवगण, सलमान खान, शाहरुख खान, करिश्मा कपूर यांसारख्या सेलिब्रिटींचा इंडस्ट्रीमध्ये बोलबाला होता. ९० च्या दशकातील काही कलाकार आजही मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत, तर काहींनी मात्र अभिनयाला राम राम ठोकला आहे. ९० च्या दशकात अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांच्या नात्याच्या तुफान चर्चा रंगल्या. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहचू शकलं नाही. १९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमात अजय आणि करिश्मा यांनी महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘जिगर’ सिनेमानंतर अनेक सिनेमांमध्ये दोघे एकत्र दिसले. मोठ्या पडद्यावर दोघांची जोडी हिट ठरली.

अजय आणि करिश्मा यांना रिल लाईफमध्येच नाही रियल लाईममध्ये एकत्र असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या. पण जेव्हा अजय आणि करिष्मा यांच्या नात्याची चर्चा सुरु होती तेव्हा अभिनेता अभिनेत्री रवीना टंडन हिला डेट करत होता. अभिनेत्याच्या आयु्ष्यात अभिनेत्री करिश्मा कपूर हिची एन्ट्री झाल्यानंतर अजय आणि रवीना यांच्यात वाद सुरु झाले. तेव्हा रवीना आणि अजय यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं होतं, तर दुसरीकडे करिश्माने नुकताच इंडस्ड्रीमध्ये पदार्पण केलं होतं.

१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘जिगर’ सिनेमात अजय आणि करिश्मा यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अजय आणि करिश्मा यांच्यातील नातं नवं रुप घेत होतं. दोघांच्या नात्याचे किस्से अनेक मासिकांमध्ये देखील छापून येवू लागले. करिश्मा कपूर आणि अजय देवगण यांनी एकमेकांना जवळपास तीन वर्ष डेट केलं.

हे सुद्धा वाचा

ajay devgn

एका मुलाखतीत करिश्मा म्हणाली, ‘अजय देवगण माझा चांगला मित्र आहे. मैत्रीच्या पुढे अजयसोबत माझं कोणतंही नातं नाही. आम्ही एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं. पण काही लोकांनी आमच्या नात्याला वेगळं नाव दिलं.’ असं म्हणत अभिनेत्री रंगणाऱ्या चर्चा फक्त अफवा असल्याचं सांगितलं.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्या आणि अजयच्या नात्याबद्दल अनेक गोष्टी छापून येवू लागल्या. तेव्हा जहांगीर वाडियाचा मला फोन आहे. त्याने मला विचारलं तुझ्याबद्दल हे काय वाचत आहे… त्यानंतर जहांगीर भारतात येणार होता… माझी काहीही चूक नसताना मला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला.’ करिश्मा कायम तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहीली.

श्रीमंत जहांगीर वाडिया याच्यामुळे करिश्मा आणि अजय यांचं नातं तुटलं…. अशी चर्चा देखील तुफान रंगली. अनेक सेलिब्रिटींसोबत करिश्माच्या नावाची चर्चा रंगल्यानंतर अभिनेत्रीने उद्योगपती संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. करिश्मा कपूर हिने खासगी आयुष्यात अनेक चढ – उतारांचा सामना केला. घटस्फोटानंतर करिश्मा कपूर दोन मुलांचा ‘सिंगल मदर म्हणून’ सांभाळ करत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.