Karisma Kapoor | ‘तो मला एकटं सोडून गेला आणि…’, करिष्माने पहिल्या पतीवर आरोप केले तेव्हा…

| Updated on: Sep 15, 2023 | 3:03 PM

Karisma Kapoor | करिष्मा कपूर हिचं वैवाहिक आयुष्य प्रचंच खडतर... अभिनेत्री चार महिन्यांच्या मुलाला घेवून ट्रीपसाठी गेली, पण पहिल्या पतीने मात्र...; सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त करिष्मा कपूर हिच्या खासगी आयुष्याची चर्चा

Karisma Kapoor | तो मला एकटं सोडून गेला आणि..., करिष्माने पहिल्या पतीवर आरोप केले तेव्हा...
रणधीर कपूर यांच्यासोबत भांडण झाल्यानंतर बबिता कपूर दोन मुलींना घेवून वेगळ्या राहू लागल्या. तेव्हा करिश्मा हिने सर्व जबाबदारी सांभाळली असल्याचं अनेकदा समोर आलं. करिना हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..
Follow us on

मुंबई : 15 सप्टेंबर 2023 | ‘राजा बाबू’, ‘कुली नंबर १’, ‘साजन चले ससुराल’ आणि ‘जीत’ यांसारख्या अनेक सिनेमांच्या माध्यमातून अभिनेत्री करिश्मा कपूर हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. करिश्मा कपूर ९० च्या दशकात अभिनय जगतात अव्वल होती. गोविंदा, शाहरुख खान यांसारख्या स्टार्ससोबत देखील तिने स्क्रिन शेअर केली. आज देखील करिश्मा तिच्या अभिनयामुळे आणि डान्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील करिश्मा हिच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी रंगलेल्या असतात.

करिश्मा आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगलेल्या असतात. करिश्मा हिला प्रोफेशनल आयुष्यात यश मिळालं, पण अभिनेत्रीचं खासगी आयुष्य प्रचंड खडतर होतं. लग्ना आधी आणि लग्नानंतर देखील अभिनेत्रीने अनेक धक्कादायक गोष्टींचा सामना केला.

उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न करण्याआधी करिश्मा हिचं नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडण्यात आलं. अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत तर करिश्मा हिचा साखरपुडा देखील झाला होता. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. अखेर अभिनेत्रीने आईच्या ईच्छेनुसार उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्रीने २००३ मध्ये उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण संजय कपूर याच्यासोबत देखील अभिनेत्रीचं नातं अधिक काळ टिकू शकलं नाही. अखेर २०१४ मध्ये दोघांचे मार्ग वेगळे झाले. करिश्मा हिने सासरच्या मंडळींवर अनेक गंभीर आरोप केले. अभिनेत्रीने सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले.

लग्नानंतर काही वर्षात करिश्मा आणि संजय यांच्यामध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली. नात्यात होणारी भांडणं मिटवण्यासाठी अभिनेत्रीने परदेशात ट्रिपला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण चार महिन्यांचा मुलगा आजारी असल्यामुळे करिश्मा फिरायला जावू शकली नाही.

ट्रिपबद्दल अभिनेत्री म्हणाली, ‘मी जात नसल्यामुळे संजय नाराज झाला होता. त्याने मला एकटं सोडून जायचा निर्णय घेतला. ज्यामुळे मी माझ्या चार महिन्यांच्या मुलाचा सांभाळ करु शकेल. संजय याला प्रिंन्स विलियम यांच्यासोबत पोलो खेळायचं होतं… त्यानंतर मी देखील ट्रीपसाठी गेली.’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी ट्रीपसाठी गेली, पण तेव्हा संजय कायम बाहेर असायचा. मी सकाळी मुलाला स्तनपान करायला उठवायची तेव्हा तो सकाळी घरी परतायचा…’ असं देखील अभिनेत्री करिश्मा कपूर एका मुलाखतीत म्हणाली.