‘ती’ एक अट नाही तर, आज पती – पत्नी असते अभिषेक बच्चन – करिश्मा कपूर; का तुटला साखरपुडा?

अभिषेक बच्चन - करिश्मा कपूर पूर्ण करु शकले नाहीत एक अट; ज्यामुळे दोघांची 'अधुरी प्रेम कहाणी...', एका मोठ्या कारणामुळे तुटला साखरपुडा

'ती' एक अट नाही तर, आज पती - पत्नी असते अभिषेक बच्चन - करिश्मा कपूर; का तुटला साखरपुडा?
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 10:39 AM

मुंबई | 29 जुलै 2023 : बॉलिवूडमधील ९० दशकातील सेलिब्रीटी आज त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत. काही सेलिब्रिटींनी त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत लग्न केलं, तर काही सेलिब्रिटींना मात्र वैवाहिक जीवनाचा आनंद घेताच आला नाही. बॉलिवूडमध्ये असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांची प्रेम कहाणी लग्नापर्यंत पोहोचली नाही. अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या नात्याची देखील चाहत्यांमध्ये तुफान चर्चा रंगली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत देखील पोहोचलं, पण साखरपुडा झाल्यानंतर एका अटीमुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

महानायक अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. साखपुड्यानंतर दोघांच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील प्रत्येकाला प्रतीक्षा होती. कारण बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध कुटुंब एका खास नात्यात बांधली जाणार होती. पण तसं काही झालं नाही. नातं साखरपुड्यापर्यंत पोहोचल्यानंतर करिश्मा आणि अभिषेक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्टनुसार, करिश्मा कपूर हिची आई बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबियांपुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा… बच्चन कुटुंबीयांनी मात्र बबिता यांच्या अटीवर आक्षेप घेतला… असं देखील म्हटले जात. बबिता यांच्या अटीमुळे बच्चन आणि कपूर कुटुंबातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता.

हे सुद्धा वाचा

फक्त बबिता कपूर यांनीच नाही तर, जया बच्चन यांनी करिश्मा हिच्या पुढे एक घट घातली होती. लग्नानंतर करिश्मा सिनेमांमध्ये काम करणार नाही… अशी जया बच्चन यांनी अट होती असं देखील अनेकदा समोर आलं. रिपोर्टनुसार, करिश्माला ही अट मान्य नव्हती. ज्यामुळे करिश्मा – अभिषेक यांचा साखरपुडा तुटला आणि दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही..

अभिषेक याच्यासोबत साखरपुडा तुटल्यानंतर करिश्मा कपूर हिने श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. करिश्मा – संजय यांनी घटस्फोटा दरम्यान एकमेकांवर गंभीर आरोप केलं. करिश्मा संजय याची दुसरी पत्नी होती. करिश्मा हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय याने तिसरं लग्न केलं. पण अभिनेत्रीने मात्र दोन मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला.

तर अभिषेक बच्चन याने अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यासोबत लग्न केलं. फार कमी लोकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. अभिषेक आणि ऐश्वर्या यांना एक मुलगी देखील आहे. त्यांच्या मुलीचं नाव आराध्या बच्चन असं आहे…

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.