बॉलिवूडमध्ये असे देखील काही कलाकार आहेत, ज्यांची प्रेम कहाणी लग्नापर्यंत पोहोचली नाही. अशाच सेलिब्रिटींपैकी एक कपल म्हणजे अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) … एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त करिश्मा आणि अभिषेक यांच्या नात्याची चर्चा होती. महानायक अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर करिश्मा आणि अभिषेक यांचा साखरपुडा झाला होता. साखपुड्यानंतर दोघांच्या लग्नाची इंडस्ट्रीमधील प्रत्येकाला प्रतीक्षा होती. पण साखरपुडा झाल्यानंतर देखील करिश्मा – अभिषेक यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही.
करिश्मा – अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, 5 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांचा साखरपुडा झाला. पण साखरपुड्याच्या 4 महिन्यानंतर करिश्मा – अभिषेक यांच्यामधील सर्व संबंध संपले. रिपोर्टनुसार, बच्चन कुटुंबाची सून होण्यासाठी करिश्मा उत्सुक होती. अभिनेत्री म्हणाली होती, ‘बच्चन कुटुंब माझ्यासाठी उत्तम कुटुंब आहे. मी बच्चन कुटुंबाची सून होणार आहे… म्हणून मी आनंदी आहे…’
‘माझ्यासाठी बच्चन कुटुंबाशिवाय दुसरं कोणतंच कुटुंब असू शकत नाही…’ असं देखील अभिनेत्री तेव्हा म्हणाली होती. सांगायचं झालं तर, अभिषेक याने एक डायमंड रिंग देत करिश्मा हिला प्रपोज केला होता आणि तेव्हा अभिनेत्री देखील अभिषेक याला नाही म्हणू शकली होती. अशात दोघाचं नातं साखरपुड्यापर्यंत तर पोहोचलं पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
करिश्मा कपूर हिची आई बबिता कपूर यांनी बच्चन कुटुंबियांपुढे काही अटी ठेवल्या. त्यामधील एक अट म्हणजे बच्चन कुटुंबाने लग्नाआधी संपत्तीचा काही भाग अभिषेक याच्या नावावर करायचा… बच्चन कुटुंबीयांनी मात्र बबिता यांच्या अटीवर आक्षेप घेतला… असं देखील म्हटले जात. बबिता यांच्या अटीमुळे बच्चन आणि कपूर कुटुंबातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता.
करिश्मा कपूर हिच्यासोबत झालेल्या साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेक याच्या आयुष्यात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिची एन्ट्री झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. ऐश्वर्या – अभिषेक यांनी 2007 मध्ये कुटुंबियांच्या उपस्थित लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या बच्चन हिला जन्म दिला. तर करिश्मा आता सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.