करिश्मा कपूरची सख्खी बहीण सिद्धिमा कपूर; फार क्वचित लोकांना माहीत असेल ‘ही’ गोष्ट
कपूर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल चित्रपटप्रेमींना चांगलीच माहिती असेल. मात्र सिद्धिमा कपूर नावाची व्यक्तीसुद्धा कपूर कुटुंबात आहे, हे फार क्वचित लोकांना माहीत असेल. होय, सिद्धिमा ही करिश्मा कपूरची सख्खी बहीण आहे. हे वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला ना?
मुंबई | 16 ऑक्टोबर 2023 : कपूर घराणं हे बॉलिवूड इंडस्ट्रीतील नामांकित कुटुंब आहे. या घराण्यातील एक-दोन नाही तर चार पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत आहेत. पृथ्वी राज कपूरपासून राज कपूर, ऋषी कपूर आणि आता रणबीर कपूर, करिश्मा कपूर आणि करीना कपूर मोठ्या पडद्यावर सक्रीय आहेत. 90 च्या दशकात करिश्मा लोकप्रिय अभिनेत्री होती. रणबीर आणि करीना यांचासुद्धा मोठा चाहतावर्ग आहे. कपूर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीबद्दल चाहत्यांना चांगली माहिती आहे. मात्र तुम्हाला सिद्धिमा कपूरविषयी माहीत आहे का? फार क्वचित लोकांना तिच्याविषयी माहिती असेल.
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्रींपैकी एक करिश्मा कपूरची छोटी बहीण सिद्धिमा कपूर आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की करिश्माची एकच सख्खी बहीण आहे आणि तिचं नाव करीना कपूर आहे. मग ही सिद्धिमा कपूर आहे तरी कोण? तर ही सिद्धिमा दुसरी कोणी नसून ‘बेबो’च आहे. बेबो हे टोपणनाव अनेकांनाच माहीत असेल. करीनालाच ‘बेबो’ म्हटलं जातं. तर तिची मोठी बहीण करिश्माचं टोपणनाव ‘लोलो’ असं आहे. करीनाचं खरं नाव सिद्धिमा आहे हे फार क्वचित लोकांना माहीत असेल.
View this post on Instagram
करीनाला सिद्धिमा हे नाव तिचे आजोब राज कपूर यांनी दिलं होतं. मात्र तिच्या आईने नंतर करीना असं ठेवलं, अन्ना करेनिना या पुस्तकातून त्यांनी हे नाव घेतलं होतं. हे पुस्तक करिश्मा आणि करीनाच्या आईने प्रेग्नंसीच्या काळात वाचलं होतं. त्यातूनच प्रभावित होत त्यांनी करीना हे नाव दिलं होतं. करीना ‘बेबो’ या नावानेही ओळखली जाते. तिला घरात आणि इंडस्ट्रीतील काही जवळच्या लोकांकडून ‘बेबो’ म्हणूनच हाक मारली जाते. हे टोपणनाव तिला तिचे वडील रणधीर कपूर यांनी दिलं आहे.
बेबो या नावावरून एक गाणंसुद्धा चित्रीत करण्यात आलं आहे. ‘कमबख्त इश्क’ या चित्रपटात करीनाने अक्षय कुमारसोबत काम केलं होतं. त्यातच हे गाणं असून त्याला चांगली लोकप्रियता मिळाली होती. हा चित्रपट 2009 मध्ये प्रदर्शित झाला होता.