मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या फक्त आणि फक्त त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या. लग्नानंतर घटस्फोट आणि ‘सिंगल मदर’ म्हणून आलेली जबाबदारी… बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींच्या आयुष्यात आनंद आला पण फर कमी कालावधीसाठी. घटस्फोटानंतर या अभिनेत्रींनी दुसऱ्या लग्नाचा विचार न करत संपूर्ण आयुष्य मुलांचा सांभाळ केला. पण काही अभिनेत्रींच्या पतीने मात्र घटस्फोटानंतर दुसरं लग्न करत नवीन संसार थाटला. आज अशा ४ अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सिंगल मदर म्हणून मुलांचा सांभाळ करत आहेत.
अभिनेत्री संगीता बिजलानी
एक काळ असा होता, जेव्हा संगीती बिजलानी आणि अभिनेता सलमान खान याच्या नात्याच्या चर्चा तुफान रंगल्या. पण अभिनेत्रीने माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीन यांच्यासोबत लग्न केलं. जवळपास १४ वर्ष संसार केल्यानंतर दोघांनी २०१० मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला. वयाच्या ६२ व्या वर्षी अभिनेत्री एकटी आयुष्य जगत आहे, जिने कधी सलमान खान याच्यासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहिले होते.
अभिनेत्री महिमा चौधरी
‘परदेस’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर एका रात्रीत महिमा चौधरी हिला लोकप्रियता मिळाली. काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिका बजावल्यानंतर महिमाने बॉबी मुखर्जी सोबत २००६ साली लग्न केलं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. त्यानंतर अभिनेत्रीने मुलगी आर्यना चौधरी हिचा एकटीने सांभाळ केला.
अभिनेत्री करिश्मा कपूर
मोठ्या पडद्यावर भरभरुन यश मिळालं असलं तरी, खासगी आयुष्याच मात्र लोलोला अनेक संकटांचा सामना करावा लागला. दोन मुलांचा जन्म झाल्यानंतर करिश्मा आणि पहिला पती संजय कपूर यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर संजन याने लग्न केलं, पण करिश्माने मात्र संपूर्ण आयुष्य मुलांचा सिंगल मदर म्हणून सांभाळ केला.
सुझान खान
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला. अभिनेत्याचं अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध असल्यामुळे हृतिक आणि सुझान यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलं सुझान हिच्याकडे राहत आहेत. घटस्फोटानंतर देखील हृतिक रोशन आणि सुझान महत्त्वाच्या क्षणी मुलांसोबत असतात.