जेव्हा रेखा यांची सवत झाली करिश्मा कपूर… तेव्हा प्रचंड घाबरली होती कपूर कुटुंबाची लेक, कारण…
Karisma Kapoor : जेव्हा रेखा यांची सवत झाली करिश्मा कपूर..., तेव्हा सर्वत्र रंगली होती करिश्मा कपूर आणि रेखा यांची चर्चा, मोठ्या निर्णयानंतर प्रचंड घाबरली होती कपूर कुटुंबाची लेक... कारण जाणून व्हाल थक्क, सध्या सर्वत्र करिश्मा कपूर आणि रेखा यांची चर्चा...
मुंबई | 8 जानेवारी 2024 : अभिनेत्री करिश्मा कपूर तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, कायम खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीचं नाव जोडण्यात आलं. पण श्रीमंत उद्योजक संजय कपूर याच्यासोबत करिश्मा हिचं लग्न झालं. पण अभिनेत्रीचं लग्न फार काळ टिकलं नाही, अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता करिश्मा ‘सिंगल मदर’ म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे. करिश्मा बॉलिवूडपासून देखील दूर आहे. पण एक काळ असा होता, तेव्हा करिश्मा हिच्यासोबत काम करण्यासाठी अभिनेते आणि दिग्दर्शक रांगेत होते. पण अभिनेत्री रेखा यांच्यासोबत काम करण्यात करिश्मा हिला प्रचंड भीती वाटत होती.
2001 मध्ये करिश्मा कपूर हिने ‘झुबैदा’ सिनेमात रेखा यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. सिनेमात करिश्मा हिने रेखा याच्या सवतीची भूमिका साकारली होती. पण सिनेमासाठी होकार देताना करिश्मा प्रचंड घाबरली होती. सिनेमात करिश्मा हिने मुख्य भूमिका साकारली होती. राजस्थानच्या मारवाड राजघराण्यातील झुबैदा आणि राजा हनवंत सिंग यांची प्रेमकथा सिनेमाच्या माध्यमातून दाखवण्यात आली होती.
‘झुबैदा’ सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केलं होतं. एका मुलाखतीत श्याम म्हणाले होते, ‘करिश्मा तेव्हा दोन कारणांमुळे घाबरली होती. पहिलं कारण म्हणजे सिनेमा साईन करण्यासाठी आणि सिनेमात रेखा असल्यामुळे करिश्मा घाबरली होती. दुसरं कारण म्हणजे, करिश्मा हिने कधीच कोणत्या गंभीर विषयावर अधारित सिनेमात काम केलं नव्हतं…’
अखेर करिश्मा हिने सिनेमा करण्यास होकार दिला आणि तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक झालं. खुद्द करिश्मा हिने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होतं की, सिनेमा साईन करण्यासाठी तिला खूप वेळ लागला, ती या भूमिकेसाठी स्वत:ला तयार करू शकत नव्हती. मात्र, समिक्षक आणि सर्वच स्तरातून करिश्मा हिचं कौतुक झालं.
महत्त्वाचं म्हणजे, सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकला नाही, पण सिनेमासाठी करिश्मा हिला पुरस्कारही मिळाला होता. सांगायचं झालं तर, करिश्मा आज बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, तिच्याबद्दल अनेक चर्चा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. आता देखील करिश्मा आणि रेखा स्टारर ‘जुबैदा’ सिनेमाची चर्चा रंगली आहे.
करिश्मा कपूर आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.