Karthik Aaryan | कार्तिक आर्यन याचा धमाका सुरूच, सत्यप्रेम की कथाच्या यशानंतर लगेचच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, लंडनमधून…

बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन याचे चित्रपट गेल्या काही दिवसांपासून धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे सत्यप्रेम की कथा या चित्रपटाने देखील जबरदस्त अशी कमाई केली आहे. कियारा आणि कार्तिक आर्यन याच्या जोडीला प्रेक्षकांचे सतत प्रेम मिळताना दिसत आहे.

Karthik Aaryan | कार्तिक आर्यन याचा धमाका सुरूच, सत्यप्रेम की कथाच्या यशानंतर लगेचच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, लंडनमधून...
Follow us
| Updated on: Jul 11, 2023 | 8:00 PM

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Karthik Aaryan) हा सध्या तूफान चर्चेत असलेला अभिनेता आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी बाॅलिवूडच्या फेमस अभिनेत्यांचे चित्रपट फ्लाॅप जात होते. त्यावेळी कार्तिक आर्यन याचा भूल भुलैया 2 धमाल करत होता. भूल भुलैया 2 (Bhool Bhulaiya 2 चित्रपट हिट ठरल्यानंतर कार्तिक आर्यन याच्याकडे चित्रपटांच्या लाईन लागल्या आहेत. सध्या कार्तिक आर्यन याचे शेड्युल बिझी आहे. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांचा नुकताच रिलीज झालेला सत्यप्रेम की कथा (Satyaprem Ki Katha) हा चित्रपट धमाल करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने जगभरातून तब्बल 100 कोटींचे कलेक्शन हे केले आहे. कार्तिक आर्यन आणि कियाराची जोडी परत एकदा हिट ठरलीये.

कार्तिक आर्यन याच्या संपर्कात काही दिवसांपूर्वी हेरा फेरी 3 चे निर्माता देखील होते. अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी कार्तिक आर्यन याच्यासोबत संपर्क साधला होता. विशेष म्हणजे हेरा फेरी 3 चित्रपटात काम करण्यासाठी कार्तिकही सकारात्मक होता. मात्र, अचानक अक्षय कुमार याने हेरा फेरी 3 चित्रपटाला होकार दिला.

सत्यप्रेम की कथा चित्रपट रिलीज झाल्यानंतर थोडाही ब्रेक हा कार्तिक आर्यन याने घेतला नसून आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला कार्तिक आर्यन याने सुरूवात केलीये. आगामी चंदू चॅम्पियन चित्रपटाच्या शूटिंगसाठी कार्तिक आर्यन हा लंडनमध्ये गेला असून चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्यात आलीये.

विशेष म्हणजे चंदू चॅम्पियन चित्रपटाचे निर्माता साजिद नाडियाडवाला यांनीच याबद्दल एका मुलाखतीमध्ये माहिती दिली आहे. पुढचे काही दिवस कार्तिक आर्यन हा बिझी असणार आहे. कार्तिक आर्यन याचे चित्रपट धमाका करत असल्याने अनेक चित्रपट हे कार्तिक आर्यन याच्याकडे आहेत. आता पुढचा चित्रपट काय धमाल करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

विशेष म्हणजे कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी हे सत्यप्रेम की कथा चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसले. आजच कियारा अडवाणी हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांसोबत मोठी माहिती शेअर केलीये. सत्यप्रेम की कथा चित्रपटाने जगभरातून 100 कोटींचे कलेक्शन करत तो 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाल्याचे कियारा अडवाणी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.