कार्तिक आर्यन आणि करण जोहरमधील वाद मिटला, अभिनेता शोमध्ये होणार सहभागी?
कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटाने मोठा धमाका केला. कार्तिक आर्यन हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला.

मुंबई : करण जोहर हा नेहमीच चर्चेत असतो. इतकेच नाही तर करण जोहर (Karan Johar) याच्यावर टीका देखील मोठ्या प्रमाणात केली जाते. करण जोहर याला नेपोटिझमचा गाॅड फायद म्हटले गेले आहे. करण जोहर याने आतापर्यंत अनेक स्टार किड्सला बाॅलिवूडमध्ये लाॅन्च केले. आलिया भट्ट (Alia Bhatt) हिला देखील करण जोहर यानेच लाॅन्च केले. मध्यंतरी चर्चा होती की, शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला देखील करण जोहर हाच लाॅन्च करणार आहे. करण जोहर सोशल मीडियावर सक्रिय असतो.
कॉफी विथ करण शोचे नवीन सीजन घेऊन लवकरच करण प्रेक्षकांच्या भेटीला येईल. विशेष म्हणजे या सीजनमध्ये मोठे धमाके होऊ शकतात. कॉफी विथ करण या शोमध्ये बाॅलिवूडचे स्टार येतात. यावेळी करण जोहर हा स्टारला त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल प्रश्न विचारताना दिसतो. कॉफी विथ करण हा शो बऱ्याचवेळा वादात सापडताना देखील दिसतो.
करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यामध्ये दोन वर्षांपूर्वी वाद झाला. इतकेच नाही तर करण जोहर याने कार्तिक आर्यन याला आपला चित्रपट दोस्ताना 2 मधून थेट बाहेरचा रस्ता दाखवला. इतकेच नाही तर पुरस्कार सोहळ्यांमध्येही हे दोघे एकमेकांकडे दुर्लक्ष करताना बऱ्याच वेळा दिसले. करण जोहर हा कार्तिक आर्यन याच्याबद्दल जाहिरपणे बोलताना देखील दिसला.
दुसरीकडे करण जोहर याच्यासोबतच्या वादाचा अजिबातच फटका कार्तिक आर्यन याला बसला नाही. कार्तिक आर्यन याचे एका मागून एक चित्रपट धमाका करताना दिसत आहेत. आता नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यन आणि करण जोहर यांच्यामधील वाद मिटलाय. इतकेच नाही तर कॉफी विथ करण शोमध्ये कार्तिक आर्यन हा सहभागी या सीजनमध्ये होऊ शकतो.
आता यामुळे कार्तिक आर्यन याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय. करण जोहर आणि कार्तिक आर्यन यांच्यामध्ये चित्रपटाच्या फिसवरून वाद झाल्याचे सांगितले जात होते. आता या वादावर पडदा पडलाय. कार्तिक आर्यन याचा काही दिवसांपूर्वीच सत्यप्रेम की कथा हा चित्रपट रिलीज झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटात कार्तिक आर्यन याच्यासोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसली.