Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट ‘धमाका’ ओटीटीवर प्रदर्शित होणार?

कार्तिक आर्यनच्या (Karthik Aryan) 'धमाका' (Dhamaka) चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Dhamaka | कार्तिक आर्यनचा चित्रपट 'धमाका' ओटीटीवर प्रदर्शित होणार?
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 12:32 PM

मुंबई : कार्तिक आर्यनच्या (Karthik Aryan) ‘धमाका’ (Dhamaka) चित्रपटाचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. आता यासंदर्भात एक मोठी बातमी येत आहे. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो असे सांगितले जात आहे. निर्मात्यांना चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्याबरोबरच हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी इच्छा आहे. अशा परिस्थितीत आता हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होऊ शकतो. 22 नोव्हेंबरला चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती आणि शूटिंग डिसेंबरमध्ये 10 दिवसात पूर्ण झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार निर्माता रॉनी स्क्रूवाला आणि दिग्दर्शक राम माधवानी हे लवकरात लवकर चित्रपट रिलीज करू इच्छित आहेत. (Karthik Aryan’s film ‘Dhamaka’ will be screened OTT)

यापूर्वी हा चित्रपट दिग्दर्शक राहुल ढोलकिया दिग्दर्शित करणार असल्याची बातमी मिळाली होती. जान्हवी कपूर (Jahnavi Kapoor) आणि कार्तिक आर्यन (Karthik Aryan) नवीन वर्षाचे स्वागत त्यांनी गोव्यात केले. गोव्याचे त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. यामुळे आता जाह्नवी आणि कार्तिकच्या अफेयर्सच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहे. मात्र, अद्यापपर्यंत जाह्नवी आणि कार्तिकने त्यांच्या नात्या संदर्भात कोणतेही भाष्य केले नाही. गोव्यातील एका फोटोमध्ये जाह्नवी आणि कार्तिकने एक सारख्याच रंगाचे ड्रेस घातले होते, त्यांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला देखील आहे या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा पाऊस पाडत आहेत.

कार्तिक अखेर सारा अली खान सोबत लव आज कालमध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नव्हता. सध्या कार्तिकजवळ बरीच चित्रपट आहेत. भूल भूलैया 2 मध्ये कियारा अडवाणी सोबत तर दोस्ताना 2 मध्ये जाह्नवी कपूरसोबत दिसणार आहे.

संबंधित बातम्या : 

Big Announcement | करण जोहर करणार मोठ्या चित्रपटाची घोषणा!

Tandav : राम कदम यांचं पोलीस ठाण्यात ‘तांडव’; वेब सीरिजच्या निर्मात्यांना समन्स पाठवणार

Drugs Case : ड्रग्ज प्रकरणी दीया मिर्झाच्या माजी मॅनेजरसह करण सजनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

(Karthik Aryan’s film ‘Dhamaka’ will be screened OTT)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.