शुभमन गिलला सोडून एक्स बॉयफ्रेंडसोबत सारा अली खानने केलं नव्या वर्षाचं स्वागत
शुभमन गिल नाही, तर एक्स बॉयफ्रेंडसोबत सारा अली खानचे 'ते' फोटो सोशल मीडियावर व्हायरल; सर्वत्र चर्चांना उधाण
मुंबई : अभिनेत्री सारा अली खानने ‘केदारनाथ’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर साराने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज सारा बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. अनेक चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी सारा कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. नुकताच अभिनेत्री एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता कार्तिक आर्यन सोबत नव्या वर्षाचं स्वागत करताना दिसली. महत्त्वाचं म्हणजे दोघे नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी एका खास ठिकाणी पोहोचले. यावेळी दोघांनी एकमेकांसोबत फोटो पोस्ट केले नसले, तरी सोशल मीडियावर दोघांचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेत्री इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत चाहत्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच वेळी कार्तिक आर्यनने देखील एका हॉटेलमध्ये कोणसोबत तरी चहा पिताना फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला. त्यामुळे सारा आणि कार्तिकने एकत्र नव्या वर्षाचं स्वागत केल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
महत्त्वाचं म्हणजे साराने आणखी एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सारा इब्राहिम खानसोबतच आणखी एका मैत्रिणीसोबत दिसत आहे. झगमगत्या प्रकाशात साराने नव्या वर्षाचं स्वागत केलं. अशात कार्तिकने देखील एक फोटो पोस्ट केला आहे, जो पाहून दोघे एकत्र असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मध्यंतरी सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिलच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होत्या, दोघांना एका हॉटेलमध्ये स्पॉट देखील करण्यात आलं होतं. एवढंच नाही, तर एका मुलाखतीत शुभमनने सारासोबत असलेल्या नात्यावर प्रतिक्रिया देखील दिली होती. पण अद्याप सारा आणि शुभमनने त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही.
शुभमन आणि सारा यांच्या नात्याची चर्चा होत असताना अभिनेत्री पुन्हा एक्स-बॉयफ्रेंडसोबत दिसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. सारा आणि कार्तिकने ‘लव्ह आज कल २’ सिनेमात एकत्र स्क्रिन शेअर केली. त्यानंतर दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. पण कालांतरने सारा आणि कार्तिकच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या.