Kartik Aaryan : मुलगा असावा तर कार्तिक आर्यन याच्यासारखा; अखेर अभिनेत्याने आईचं स्वप्न पूर्ण केलंच

चाहत्यांचा लोकप्रिय अभिनेता आर्यन याने आईचं स्वप्न अखेर पूर्ण केलं... सर्वत्र होत आहे अभिनेत्याचं कौतुक... चाहत्यांमध्ये फक्त आणि फक्त कार्तिक याची चर्चा...

Kartik Aaryan : मुलगा असावा तर कार्तिक आर्यन याच्यासारखा; अखेर अभिनेत्याने आईचं स्वप्न पूर्ण केलंच
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 12:37 PM

मुंबई | मुलं यशाच्या उच्च शिखरावर पोहोचली तरी आईवर मुलांचं असलेलं प्रेम कधीही कमी होत नाही. आईसाठी आज काय खास करता येईल यासाठी प्रत्येक मुलगा आणि मुलगी खटाटोप करत असतात. अभिनेता कार्तिक आर्यन याने देखील आईचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. अनेक वर्षांनंतर अभिनेत्याने आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे. ज्यामुळे सर्वच स्तरातून अभिनेत्याचं कौतुक होत आहे. आईचं स्वप्न पूर्ण केल्यामुळे चाहते अभिनेत्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहोत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कार्तिक आर्यन याची चर्चा रंगत आहे. तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की, कार्तिक याने आईसाठी असं केलं तरी काय, ज्यामुळे सर्वत्र फक्त अभिनेत्याच्या चर्चा रंगताना दिसत आहेत.

कार्तिक आर्यन याच्याबद्दल सांगायचं झालं तर, तोच बॉलिवूडमधील मोस्ट एलिजिबल बॅचलर आहे. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अभिनेत्याच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक आहेत. सध्या अभिनेत्याचा ‘सत्यप्रेम की कथा’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्याने आईसाठी मुंबईत आलिशान घर खरेदी केलं आहे.

मायानगरीत स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. अशात कार्तिक याने देखील आईचं स्वप्न पूर्ण केलं आहे. कार्तिक याने मुंबईत घर घेण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले आहेत. रिपोर्टनुसार, कार्तिक याने मुंबईतील जुहू याठिकाणी भव्य घर घेतलं आहे. अभिनेत्याच्या घराची किंमत १७ कोटी ५० लाख रुपये आसे असं सांगण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

अभिनेत्याचं नवीन घर १ हजार ९१६ क्षेत्रफळात पसरलेला आहे. जुहू मधील सिद्धी-विनायक इमारतीत दुसऱ्या मजल्यावर अभिनेत्याने घर खरेदी केलं आहे. रिपोर्टनुसार, कार्तिक याची आई त्याचं इमारतीत आठव्या मजल्यावर राहते. कार्तिक याच्या आईने ३० जून रोजी लेकाच्या नव्या घरासाठी व्यवहार केला होता.

मुंबईत घर घेवून कार्तिक याने आईचं मोठं स्वप्न पूर्ण केलं आहे. शिवाय चाहत्यांमध्ये मुलगा हवा तर असा अशी चर्चा रंगत आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कार्तिक याने कधीही मागे वळून पाहिलं नाही. आज कार्तिक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. सध्या अभिनेता ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमामुळे चर्चेत आहे.

‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमात कार्तिक याच्यासोबत अभिनेत्री किआरा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. सध्या बॉक्त ऑफिसवर ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमाचा बोलबाला सुरु आहे. यामुळे कार्तिक – किआरा स्टारर ‘सत्यप्रेम की कथा’ सिनेमात येत्या दिवसांत किती कोटी रुपयांचा गल्ला गोळा करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.