कार्तिकपेक्षा 11 वर्षांनी लहान असणारी कथित गर्लफ्रेंड श्रीलीला इतक्या कोटींची मालकीण
कार्तिक आर्यन आणि श्रीलीला यांच्या कथित नातेसंबंधाची चर्चा सध्या जोरदार होताना दिसत आहे. श्रीलीला अभिनेत्री असण्यासोबतच तिने एमबीबीएसची पदवीही मिळवली आहे. पण श्रीलीलाची एकूण नेटवर्थ किती आहे माहिती आहे का? चला जाणून घेऊयात

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे नाव एका अभिनेत्रीमुळे बरंच चर्चेत आहे. त्या अभिनेत्री म्हणजे श्रीलीला. श्रीलीला आणि कार्तिक आर्यन हे दोघं खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत की नाही. याविषयी त्या दोघांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसेच याबाबतची हींट कार्तिकच्याच आईने दिल्याचं म्हटलं जात आहे. कार्तिकची आई माला यांनी जयपुरमध्ये एका अवॉर्ड शोमध्ये त्यांच्या रिलेशनशिपवर हिंट दिली. जेव्हा त्यांना त्यांच्या होणाऱ्या सुनेविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की कुटुंबाला एक चांगली डॉक्टर पाहिजे. त्यानंतर सगळे श्रीलीलाविषयी बोलू लागले कारण ती अभिनेत्री असण्यासोबत तिनं मेडिकलमध्ये शिक्षण केलं आहे.
श्रीलीला एमबीबीएस डॉक्टर
श्रीलीलानं मेडिकलमध्ये शिक्षण केलं आणि त्यासोबत अभिनय देखील केला. 2021 मध्ये श्रीलीलानं एमबीबीएस पूर्ण केलं. श्रीलीला ही बंगळुरुच्या गायनॅकोलॉजिस्ट स्वर्णलता यांची लेक आहे. श्रीलीलाचा जन्म हा तिचे आई-वडील विभक्त झाल्यानंतर झाला.
‘किस’ या चित्रपटातून तिन अभिनय क्षेत्रात पदार्पण
‘किस’ या चित्रपटातून तिन अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ती एक ट्रेन्ड भरतनाट्यम डान्सर देखील आहे. 2022 मध्ये श्रीलीलानं अनाथआश्रमात जाऊन गुरु आणि शोभिता नावाच्या दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतलं आहे. त्यांना चांगलं आयुष्य मिळावं यासाठी तिनं हा निर्णय घेतला.
श्रीलीलाची एकूण नेटवर्थ
श्रीलीलाची एकूण नेटवर्थ ही जवळपास 15 कोटी असल्याचं म्हटलं जातं. सुरुवातीला चित्रपटासाठी प्रत्येकी एक तासासाप्रमाणे 4 लाख मानधन ती घ्यायची. त्यानंतर जसजसं तिचे इंडस्ट्रीट नाव होऊ लागले तसं तसं तिचं मानधन वाढवत गेलं. नंतर ती 1.5 कोटी घेऊ लागली. त्यानंतर तिने 3 कोटी मानधन घेतलं. आणि आता तिने 4 कोटी मानधन घेण्यास सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे.
‘आशिकी 3’ मधून कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार
‘आशिकी 3’ मधून कार्तिक आर्यन आणि श्रीलीला पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अनुराग बसूच्या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. टीझरमध्ये कार्तिक हा ‘तू मेरी जिंदगी’ गाणं गाताना दिसत आहे. त्याच्या रोमॅन्टिक सीनची हलकीशी झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. तर हा चित्रपट यंदाच्या वर्षी अर्थात 2025 मध्ये दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे. आशिकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागाच्या सक्सेसनंतर आता प्रेक्षकांनी नक्कीच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाकडूनही तेवढीच अपेक्षा आहे.