Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचं निधन; 3 दिवसांनंतर मिळाले मृतदेह

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत सोळा जणांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यात अभिनेता कार्तिक आर्यनच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. घटनेच्या तीन दिवसांनंतर कार्तिकच्या मामा-मामीचे मृतदेह सापडले. गुरुवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचं निधन; 3 दिवसांनंतर मिळाले मृतदेह
Kartik Aaryan’s relativesImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 17, 2024 | 2:58 PM

सोमवारी 13 मे रोजी घाटकोपर इथं संध्याकाळी साडेचारच्या सुमारास महाकाय लोखंडी होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळून पेट्रोल पंपावर पडला. 140 बाय 140 चौरस फुटांचा हा फलक क्षणार्धात आदळल्यामुळे जवळ उभी असलेली वाहनं आणि शंभरहून अधिक नागरिक त्याखाली सापडले. आतापर्यंत या दुर्घटनेत सोळा जणांनी आपले प्राण गमावले. त्यात अभिनेता कार्तिक आर्यनच्या जवळच्या व्यक्तींचाही समावेश आहे. कार्तिकच्या मामा-मामींनी घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेत आपला जीव गमावला आहे. घटनेच्या 50 तासांनंतर त्यांचा मृतदेह सापडला. तेव्हा त्यांना ओळखणंही कठीण होतं. अंगठीवरून त्यांची ओळख पटवण्यात आली.

60 वर्षीय मनोज चंसोरिया हे एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये जनरल मॅनेजर म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी अनिता या 59 वर्षीय होत्या. मृतदेह सापडल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कार्तिक आर्यनसुद्धा उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. मनोज चंसोरिया आणि त्यांची पत्नी हे कारने प्रवास करत होते. त्यावेळी होर्डिंगजवळ असलेल्या पेट्रोल पंपाजवळ त्यांनी पेट्रोल भरण्यासाठी कार थांबवली होती. हे दोघं मध्यप्रदेशला त्यांच्या घरी जात होते. पेट्रोल पंपाजवळ त्यांची कार थांबताच महाकाय होर्डिंग कोसळला. या होर्डिंगखाली त्यांची कार आली आणि त्यात त्यांनी प्राण गमावले.

हे सुद्धा वाचा

व्हिसाशी संबंधित औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हे दाम्पत्य मुंबईत आलं होतं. अमेरिकेत राहणाऱ्या त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी ते जाणार होते. मात्र होर्डिंग दुर्घटनेमुळे त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. घटनेच्या तीन दिवसांनंतर बचावकार्यादरम्यान त्यांचे मृतदेह सापडले. त्यानंतर त्यांचा मुलगा तातडीने भारतात परतला. अंगठीवरून दोघांच्या मृतदेहांची ओळख पटली. गुरुवारी सहार स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी इतर कुटुंबीयांसोबत कार्तिक आर्यनसुद्धा त्याठिकाणी उपस्थित होता.

पूर्व द्रुतगती मार्गावर छेडानगर परिसरात पेट्रोल पंपाजवळील होर्डिंग मुळाशी असलेले लोखंडी खांब मोडून जमिनीवर आदळला. या दुर्घटनेचे व्हिडीओ काही मिनिटांतच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पाऊस पडत असल्यामुळे पेट्रोल पंपाच्या परिसरात अनेक वाहनचालक, पादचारी आडोशासाठी उभे होते. त्यांच्यावर हा महाकाय होर्डिंग कोसळल्यामुळे अनेज जण गाडले गेले. हे दृश्य अतिशय भीषण होतं.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.