Kartik Aaryan: फ्लॉप चित्रपटांवर कार्तिक आर्यनचं मोठं वक्तव्य, म्हणाला “मी एक जरी फ्लॉप चित्रपट दिला तर..”
सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर आता अभिनेता कार्तिक आर्यनचं (Kartik Aaryan) मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कार्तिकच्या 'भुल भुलैय्या 2' (Bhul Bhulaiya) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला.
सध्या सोशल मीडियावर बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंडच सुरू झाला आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटापासून सुरू झालेल्या या ट्रेंडमध्ये आता हळूहळू इतरही चित्रपटांची नावं सहभागी होऊ लागली आहेत. यापूर्वी अनेक मोठे चित्रपट या ट्रेंडला बळी पडले आहेत. सातत्याने फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांवर आता अभिनेता कार्तिक आर्यनचं (Kartik Aaryan) मोठं वक्तव्य समोर आलं आहे. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ (Bhul Bhulaiya) या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. कार्तिकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान स्टार किड्सचीही (Star Kids) खिल्ली उडवली आहे.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, “मी बॉलिवूडच्या इनसाइडर्ससारखा पॅडेड नाही. मी बाहेरचा माणूस असल्यामुळे बॉक्स ऑफिसवर माझा चित्रपट अपयशी ठरल्यास त्याचा माझ्या करिअरला खूप मोठा धोका असेल. त्यानंतर मला इंडस्ट्रीत पाठिंबा देणारा कोणीही नसेल.”
View this post on Instagram
बॉक्स ऑफिसवर सतत फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांबद्दल बोलताना कार्तिक म्हणाला की, “चित्रपट फ्लॉप होत असल्यानेच मला मोठी समस्या आहे. या गोष्टीचा माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम झाला आहे. माझ्या करिअरमध्ये मला एकही फ्लॉप चित्रपट देणं परवडू शकणार नाही. कारण असं झाल्यास माझं संपूर्ण करिअरच संपेल. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर ‘आउटसाइडर’ असल्याने मला दुसरी संधीही सहजासहजी मिळणार नाही. पण इनसाइडर्सनी काळजी करू नये, त्यांना भरपूर संधी आहेत.”
काही दिवसांपूर्वीच पान मसाला ब्रँडची जाहिरात नाकारल्याने कार्तिक प्रसिद्धीच्या झोतात आला होता. 9 कोटी रुपयांची ही ऑफर नाकारल्यानंतर लोकांकडून त्याचं खूप कौतुक झालं. ‘भूल भुलैया 2’ या सुपरहिट चित्रपटानंतर कार्तिक लवकरच ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटात कियारा अडवाणीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय हंसल मेहता यांच्या ‘कॅप्टन इंडिया’ आणि क्रिती सनॉनसोबत ‘शहजादा’ चित्रपटातही तो मुख्य भूमिकेत आहे.