सध्या मुंबईत असलेला हा अभिनेता आयफा अवॉर्ड्ससाठी अबुधाबीला (IIFA at Abu Dhabi) जाणार नाही, ज्यात तो उपस्थित राहणार होता. कार्तिक आर्यनने लिहिले की, "सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था...
नवी दिल्ली: सर्वांचा लाडका कार्तिक आर्यन आयफा अवॉर्ड्ससाठी (IIFA Awards) उपस्थित नसणार! अभिनेता कार्तिक आर्यनला कोविड-19 ची लागण झाली आहे. शनिवारी अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर आपल्या आरोग्याबद्दल माहिती दिलीये. सध्या मुंबईत असलेला हा अभिनेता आयफा अवॉर्ड्ससाठी अबुधाबीला (IIFA at Abu Dhabi) जाणार नाही, ज्यात तो उपस्थित राहणार होता. कार्तिक आर्यनने लिहिले की, “सब कुछ इतना पॉझिटिव्ह चल रहा था, कोविड से रहा नहीं गया” (सर्व ठीक चालले होते पण कोविड स्वतःला रोखू शकला नाही)” असे लिहिले आहे. कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये त्याची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. अभिनेत्याने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवरही आपली पोस्ट शेअर केली आणि हाताच्या जोडलेल्या इमोजीसह “कोविड पॉझिटिव्ह” लिहिले. कार्तिक आर्यन कियारा अडवाणी आणि तब्बू यांची सह-अभिनीत हिट हॉरर कॉमेडी भूल भुलैया 2 मध्ये दिसला होता. या सगळ्यात चाहते मात्र नाराज झाले आहेत. कार्तिक आर्यनच्या इन्स्टाग्राम पोस्टवर (Kartik Aryan Instagram Post) त्याचे चाहते त्याला, “गेट वेल सुन” असं म्हणतायत. काहींनी मात्र आयफा साठी कार्तिक नसणार म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केलीये.
‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण
कार्तिक आर्यनने लव्ह रंजनच्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि तो प्यार का पंचनामा २, कांची-द अनब्रेकेबल, लुका छुपी, गेस्ट इन लंडन आणि सोनू के टीटू की स्वीटी सारख्या चित्रपटांचा भाग आहे. इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटातही त्याने सारा अली खानच्या विरुद्ध भूमिका साकारली होती. मृणाल ठाकूरसोबत नेटफ्लिक्सच्या धमाका मध्येही त्याने अभिनय केला होता. वर्क फ्रंटवर बोलायचं झालं तर, कार्तिक आर्यन शेवटचा कियारा अडवाणी आणि तब्बू यांची सह-अभिनीत हिट हॉरर कॉमेडी भूल भुलैया 2 मध्ये दिसला होता. अभिनेता पुढे फ्रेडीमध्ये अलाया एफसोबत दिसणार आहे.