Bhool Bhulaiyaa 3 ची दमदार कमाई, प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन

Bhool Bhulaiyaa 3: ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच करतोय दमदार कमाई, अ‍ॅडव्हान्स बुकिंमध्ये 27 हजार 927 तिकिटांची विक्री, बॉक्स ऑफिसवर सिनेमाचं तगडं कलेक्शन

Bhool Bhulaiyaa 3 ची दमदार कमाई, प्रदर्शनापूर्वीच बॉक्स ऑफिसवर तगडं कलेक्शन
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 3:24 PM

Bhool Bhulaiyaa 3: अभिनेता कार्तिक आर्यन यंदाच्या दिवळीत रुह बाबा या भूमिकेतून चाहत्यांचं मनोरंजन करणार आहे. ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमात अभिनेता रुह बाबा या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. आता तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमात कार्तिक आर्यन याच्यासोबत अभिनेत्री विद्या बालन, माधुरी दीक्षित आणि तृप्ती डिमरी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचा ट्रेलर आणि गाणी प्रदर्शित झाल्यानंतर चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे. सिनेमा 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

‘भूल भुलैय्या 3’ सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच अ‍ॅडव्हान्स बुकिंमध्ये सिनेमाच्या 27 हजार 927 तिकिटांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. 1 नोव्हेंबर रोजी ‘भूल भुलैय्या 3’ आणि अभिनेता अजय देवगन स्टारार ‘सिंघम अगेन’ देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 2D फॉर्मेटमध्ये ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमाची 27 हजार 927 तिकिटे विकली गेली आहेत. म्हणजे सिनेमाने प्रदर्शनापूर्वीच 71.56 लाख रुपयांचा गल्ला जमा केला आहे. त्यामुळे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सांगायचं झालं तर, ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सोमवारपासून दिल्ली आणि मुंबईमध्ये सुरु झाली आहे. सध्या त्याची प्री-सेल छोट्या थिएटरमध्ये सुरू आहे. PVR आणि Cinepolis मध्ये अद्याप तिकिटांची विक्री सुरु झालेली नाही. रिपोर्टनुसार, बुक माय शोवर एका तासात 1.2 हजार पेक्षा जास्त तिकिटं विकण्यात यश आलं आहे.

सांगायचं झालं तर, ‘भूल भुलैय्या 3’ आणि ‘सिंघम अगेन’ दोन्ही सिनेमांमध्ये तगडी स्टार कास्ट आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिस कोणता सिनेमा बाजी मारेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण दोन्ही सिनेमांमध्ये ‘भूल भुलैय्या 3’ सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकतो… अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘भूल भुलैय्या 3’ सिनेमात कार्तिक आर्यन, तृप्ती डिमरी, माधुरी दीक्षित, विद्या बालन, राजपाल यादव, संजय मिश्रा आणि विजय राज मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सिनेमाचं बजेट 150 कोटी रुपये आहे.

तर ‘सिंघम अगेन’ सिनेमात अजय देवगन, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण यांसारखे तगडे सेलिब्रिटी आहे. त्यामुळे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर कोणत्या सिनेमाला प्रेक्षकांचं अधिक प्रेम मिळेल पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.