‘कसौटी जिंदगी की’ फेम कोमोलिका हिला पाहून म्हणाल…, आता अशी दिसते अभिनेत्री

| Updated on: Apr 29, 2024 | 11:46 AM

Kasautii Zindagi Kay | 'कसौटी जिंदगी की' फेम कोमोलिका हिचं भन्नाट ट्रान्सफॉरमेशन, मालिकेत साडीत दिसणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात अत्यंत हॉट आणि बोल्ड... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा...

कसौटी जिंदगी की फेम कोमोलिका हिला पाहून म्हणाल..., आता अशी दिसते अभिनेत्री
Follow us on

एखादी मालिका संपली जरी असली तरी मालिका आणि मालिकेतील कलाकारांची चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेली असते. सोशल मीडियाच्या काळात तर, जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशाच मालिकांमधील एक मालिका म्हणजे ‘कसोटी जिंदगी की’… मालिकेतील काही भूमिका आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत… अभिनेत्री श्वेता तिवारी हिने मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर कोमोलिका हिला देखील चाहते विसरु शकलेले नाहीत. मालिकेत कोमोलिका या भूमिकेला न्याय देणाऱ्या अभिनेत्रीचं नाव उर्वशी ढोलकिया असं आहे.

मालिकेत कोमोलिका भूमिका साकारणाऱ्या उर्वशी ढोलकिया हिला आजही चाहते विसरु शकलेले नाहीत. कोमोलिका या भूमिकेमुळे अभिनेत्रीच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये मोठ वाढ झाली. अभिनेत्रीने मालिकेत खलनायकाची भूमिका साकारली होती. उर्वशी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी सांगत असते.

हे सुद्धा वाचा

 

 

उर्वशी सोशल मीडियावर कायम स्वतःचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करत असते. वयाच्या 44 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. उर्वशी सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. पारंपरिक आणि वेस्टर्न लूकमध्ये देखील अभिनेत्री ग्लॅमरस दिसते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

सांगायचं झालं तर, उर्वशी फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. फार कमी वयात अभिनेत्रीचं लग्न झालं. लग्नानंतर उर्वशी हिने जुळ्या मुलांना जन्म दिला. धक्कादायक गोष्ट म्हणजे मुलांच्या जन्मानंतर उर्वशी हिच्या पतीने अभिनेत्रीची साथ सोडली. पतीपासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने ‘सिंगल मदर’ म्हणून जुळ्या मुलांचा सांभाळ केला. उर्वशी मुलांसोबत देखील फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

 

 

उर्वशी हिच्याबद्दल, सांगायचं झालं तर, ‘कसौटी जिंदगी की’ मालिकेत खलनायकाची भूमिका बजावत उर्वशी ढोलकिया हिने चाहत्यांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. आजही तिच्या कोमलिका या भूमिकेला चाहते विसरले नाहीत.

‘कसौटी जिंदगी की’ मालिकेनंतर अभिनेत्री ‘बिग बॉस सीझन 6’ मध्ये दिसली. शोमध्ये दमदार भूमिका बजावत उर्वशी हिने ‘बिग बॉस 6’ शोची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली. अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.