कश्मीरा शाह हिने अर्चना गाैतम हिच्यावर केले अत्यंत गंभीर आरोप, म्हणाली, माझ्या पतीसोबत..

कृष्णा अभिषेक याची बहीण आरती सिंह हिचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले. विशेष म्हणजे या लग्नात धमाल करताना कृष्णा अभिषेक आणि कश्मीर शाह हे दिसले. सर्व राग विसरून आरती सिंह हिच्या लग्नासाठी अभिनेता गोविंदा हा देखील पोहोचला होता. या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.

कश्मीरा शाह हिने अर्चना गाैतम हिच्यावर केले अत्यंत गंभीर आरोप, म्हणाली, माझ्या पतीसोबत..
Kashmera Shah and archana gautam
Follow us
| Updated on: Jul 20, 2024 | 1:42 PM

अभिनेता कृष्णा अभिषेक हा चांगलाच चर्चेत आहे. सध्या कृष्णा अभिषेक आणि त्याची पत्नी कश्मीरा शाह हे लाफ्टर शेफमध्ये धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे लाफ्टर शेफलाही प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळताना बघायला मिळतंय. अनेक मोठे कलाकार या लाफ्टर शेफमध्ये सहभागी झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच शोमध्ये स्पर्धेकांना मदत करण्यासाठी काही कलाकार गेस्ट म्हणून दाखल झाले होते. मात्र, यावेळी बिग बॉस फेम अर्चना गाैतम हिने असे काही केले की, कृष्णा अभिषेकची पत्नी कश्मीरा शाह ही चांगलीच भडकल्याचे बघायला मिळतंय. आता यावरच बोलताना कश्मीरा शाह दिसलीये. 

कृष्णा अभिषेक आणि कश्मीरा शाह यांना मदत करण्यासाठी शोमध्ये अर्चना गाैतम ही त्यांच्या टिमकडून दाखल झाली. नुकताच कश्मीरा शाह हिने एक मुलाखत दिली. कश्मीरा शाह ही म्हणाली की, अर्चना गाैतम ही आपल्या मर्यादा शोमध्ये ओलांडताना दिसली. जे मला अजिबातच आवडले नाही. तिने कृष्णा अभिषेकला जे काही बोलले ते चुकीचेच होते. 

कश्मीरा म्हणाली, अर्चना ही कृष्णासोबत जास्तच क्लोज होत होती, जे चांगले नव्हते. बिग बॉस ओटीटी 3 चे उदाहरण देत कश्मीरा हिने म्हटले की, अरमान मलिक हा आपल्या पत्नीबद्दल कसा पजेसिव्ह आहे, त्याने विशाल पांडे याला कानाखाली मारली. मी देखील तशीच पजेसिव्ह माझ्या पती आणि मुलांबद्दल आहे. 

अर्चनाने मजाकमध्ये माझ्या पतीला म्हटले की, मला मागून गळाभेट दे. मी त्याचवेळी अर्चना गाैतम हिला मर्यादेत राहण्यास सांगितले आणि तिला म्हटले की, मी तुझ्या कानाखाली देईल. कश्मीरा पुढे म्हणाली, मी सर्वकाही सहन करू शकते पण या गोष्टी मला खरोखरच अजिबातच आवडत नाहीत. माझ्या पतीला मागून गळाभेट घे ती माझ्यासमोर म्हणत होती.

यामुळेच मी अरमान मलिक याला पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हणून शकत नाही. थोडक्यात काय तर कश्मीरा शाह हिला अर्चना गाैतम हिचे वागणे अजिबातच आवडले नसल्याचे यावरून स्पष्ट होताना दिसत आहे. अर्चना गाैतम ही बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसली. मात्र, त्यावेळी अर्चना गाैतरम हिच्यावर जोरदार टीका देखील करण्यात आली. 

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.