अखेर अपघातानंतरचा चेहरा समोर; कश्मीरा शाहने व्हिडीओ शेअर करत दाखवली जखम

अभिनेत्री कश्मीरा शाहचा अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर तिच्या नाकाला भले मोठे बॅंडेज बांधलेला एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. पण आता स्वत: तिने व्हिडीओ शेअर करत अपघातानंतर आपल्या चेहऱ्यावरची जखम दाखवली आहे.

अखेर अपघातानंतरचा चेहरा समोर; कश्मीरा शाहने व्हिडीओ शेअर करत दाखवली जखम
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 4:55 PM

अभिनेत्री कश्मीरा शाह हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याची माहिती समोर आली होती. तिने इन्स्टाग्रामवर रक्ताने माखलेल्या कपड्यांचा फोटो शेअर करत ही अपघाताची माहिती दिली होती. तिने त्या फोटवर “देवा, मला वाचवल्याबद्दल आभार. भयंकर अपघात. काहीतरी मोठं होणार होतं, पण थोडक्यात बचावले. आशा आहे की या जखमांच्या खुणा राहणार नाहीत. रोजचा प्रत्येक क्षण जगा. आज माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे,” असं लिहून कश्मीराने एक फोटो पोस्ट केला होता. त्यानंतर अनेक कलाकारांनी तिला काळजी घेण्याची विनंती केली होती.तसेच ती सुखरूप असल्याबद्दल देवाचे आभारही मानले होते.

कृष्णा अभिषेकने कश्मिराचा हा अपघात कसा झाला होता याबद्दल चाहत्यांना सागितले होते की ” कश्मिरा एका मॉलमध्ये फिरत असताना अचानक तिची काचेला धडक बसली आणि तो मार इतका जबर होता की तिच्या नाकाला खूप मोठी दुखापत झाली. आणि खूप रक्तही वाहिल्याचे त्याने सांगितले होते. तसेच तिचे उपचार सुरु असल्याचेही सांगितले होतं.

कश्मीराने त्यानंतर काही दिवसांनी आणखी एक फोटो शेअर केला होता ज्यात तिच्या चेहऱ्यावर भले मोठे बॅंडेज असल्याचे दिसत होते. तसेच तिच्या शेजारी एक डॉक्टर उभे असल्याचं त्या फोटोमध्ये दिसतं होतं. मात्र त्यानंतर तिची काहीच अपडटे नव्हती. मात्र आता तिने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात तिच्या नाकावर जखम दिसत आहे. आणि नाकावर छोटशी एक पट्टी दिसत आहे.

 व्हिडीओ शेअर करत दाखवली जखम 

कश्मीराने इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले. तसेच तिने तिच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली आहे. 18 नोव्हेंबर रोजी कश्मीराचा अपघात झाला होता. आता तिने व्हिडीओ शेअर करत नाकावरची जखम दाखवली. आहे आणि ती आता बरी होत असल्याचेही चाहत्यांना सांगितले आहे.

View this post on Instagram

A post shared by Kashmera Shah (@kashmera1)

रस्त्यावरून चालताना तिने हा व्हिडीओ शूट करत असल्याचं दिसत आहेत. व्हिडीओमध्ये कश्मीरा म्हणाली, “आता नाकावर एक लहान पट्टी आहे, मोठी पट्टी काढली आहे. पण आता मी बरी आहे. सर्वांचे आभार. रस्ता ओलांडत आहे, नाहीतर इथेच पडायचे. प्रार्थना केल्यात त्यासाठी सर्वांचे आभार, लव्ह यू.” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले आहेत.

कश्मिराच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत तिला काळजी घेण्याची विनंती केली. तर काहींनी ती बरी होतेय याबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.