बंद रुममध्ये कतरिना आणि अभिनेत्याची किसींग सुरु होती; अचानक अमिताभ बच्चन आले अन्… अभिनेत्याने स्वत: सांगितला किस्सा
कतरिना कैफ आणि हा अभिनेता एका बंद रुममध्ये किसींग करत असताना अचानक अमिताभ बच्चन रुममध्ये आले, तेव्हा ते दोघेही प्रचंड घाबरले होते. पण नक्की त्यामागची काय कहाणी आहे ते जाणून घेऊयात.

बॉलिवूडमध्ये बोल्ड किंवा किसींग सीन्स आता अगदी सामान्य झाले आहेत. पण कधी कधी कलाकार या सीन्ससाठी तेवढे सहज नसतात. पण काही वेळा कथेची गरज म्हणून हे सीन्स करण्यासाठी कलाकारांना खूप तयारही करावी लागते. असाच एक किस्सा एका अभिनेत्रीसोबतही घडला होता. ती अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ.
कतरिना कैफ ही आता बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने अनेक ब्लॉकबस्टर हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे. तथापि, एक काळ असा होता जेव्हा त्याला इंडस्ट्रीत स्वतःचे नाव कमवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. या अभिनेत्रीने 2003 मध्ये कतरिना अभिनीत ‘बूम’ चित्रपटातून पदार्पण केले.
कतरिना या अभिनेत्यासोबत किसींग सीनचा सराव करत होती अन्….
दिग्दर्शक कैजाद गुस्ताद यांचा हा चित्रपट त्याच्या बोल्ड कंटेंटमुळे चर्चेत होता. या चित्रपटातील एका दृश्यात कतरिनाला गुलशन ग्रोव्हरसोबत एक किसींग सीन करायचा होता. ज्यासाठी या दोघांनी् सरावही केला होता. गुलशन ग्रोव्हर यांनी स्वतः एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ते किसिंग सीनसाठी खूप घाबरले होते.
गुलशन यांनी त्यांच्या मुलाखतीत खुलासा करताना म्हटलं होतं की, “मला कतरिना कैफसोबत एक किसिंग सीन करायचा होता. हा खूप कठीण सीन होता. याचे एक मोठे कारण म्हणजे मला अमिताभ बच्चन यांच्यासमोर हा इंटिमेट किसिंग सीन करावा लागला आणि दुसरे कारण म्हणजे त्यावेळी कतरिना कैफ इंडस्ट्रीत नवीन होती. म्हणूनच तिला देखील हा सीन करणे तेवढे सोपे वाटत नव्हते. त्यामुळे मला खूप भीती वाटत होती की काहीतरी चूक होईल. त्यामुळे आम्ही या सीनचा बऱ्यापैकी सरावही करत होतो.”
बंद रुममध्ये किसींग सीनचा सराव करत असताना अमिताभ बच्चन आले आणि…
गुलशन यांनी पुढे सांगितले की, “जेव्हा आम्ही एका बंद रुममध्ये किसींग सीनचा सराव करत होतो तेव्हा अचानक तिथे अमिताभ बच्चन खोलीत आले. आणि त्याने ते सर्व पाहिले. त्यावेळी आम्हाला फारच विचित्र वाटलं होतं. पण बिग बींना हे माहित असल्याने त्यांनी आम्हाला या सीनसाठी प्रोत्साहन दिलं”. हा किस्सा सांगत असताना गुलशन ग्रोव्हर यांनी म्हटलं की, अमिताभ यांना पाहून ते फार घाबरले होते.
दरम्यान कतरिना आणि गुलशन ग्रोव्हर यांच्यात चित्रित केलेला हा सीन खूप व्हायरल झाला होता. याबद्दल बोलताना कतरिनाही म्हणाली होती की “मी हा सीन केला नाही हे नाकारत नाही. पण मला तेव्हा खूप अस्वस्थ वाटत होतं.” तसेच हा सीन जस जसा व्हायरल झाला तस कतरिनाला आणि गुलशन यांना ट्रोलही केलं गेलं होतं.