कतरिना कैफ हिने आईला आठ मुलांना जन्म दिल्यानंतर विचारला असा प्रश्न, उत्तर ऐकून व्हाल थक्क
सात बहिणी आणि एक भाऊ... 'सिंगल मदर' म्हणून आठ भावंडांचा सांभाळ केल्यानंतर कतरिना हिने आईला विचारला असा प्रश्न, ज्याचं उत्तर जाणून तुम्हीही व्हाल थक्क
मुंबई : अभिनेत्री कतरिना कैफ आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनयाच्या जोरावर कतरिनाने कलाविश्वात स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं. बॉलिवूडमध्ये अव्वल स्थानी असेलल्या कतरिनाचं कुटुंब फार मोठं आहे. सात बहिणी आणि एक भाऊ असा कतरिना कैफ हिचा कुटुंब आहे. महत्त्वाचं म्हणजे कतरिनाची आई सुझान टर्कोटे यांनी आठ मुलांचा सांभाळ सिंगल मदर म्हणून केला. कतरिना तिच्या कुटुंबाबद्दल मोठ्या अभिमानाने सर्वांना सांगते. एका मुलाखतीमध्ये कतरिनाने तिच्या भावंडांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
कतरिनाने २०१९ मध्ये झालेल्या एका मुलाखतीत वडिलांबद्दल मोठा खुलासा केला. वडिलांबद्दल कतरिना म्हणाली, ‘आयुष्यात वडील नसल्यामुळे आधाराची कमतरता जाणवते. वडील नसल्याने कोणत्याही मुलीच्या आयुष्यात कमीपणा असतो.’ असं म्हणत अभिनेत्रीने स्वतःच्या मुलांबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
View this post on Instagram
स्वतःच्या मुलांबद्दल सांगताना कतरिना म्हणाली, ‘माझे स्वचःचे मुलं असतील तर त्यांना आई-वडील दोघांचं प्रेम मिळायला हवंय.’ पुढे कतरिना तिच्या आईच्या संघर्षाबद्दल सांगताना म्हणाली, ‘आईने एकटीने सात मुली आणि एका मुलाचा सांभाळ केला. हे सगळं ऐकायला सोपं वाटतं पण मोठं झाल्यानंतर कळालं की आठ भावंडांचा सांभाळ करणं किती कठीण असतं..’ असं कतरिना म्हणाली.
कतरिनाने आईला आठ मुलांना जन्म दिल्यानंतर, त्यांचा सांभाळ करण्यापर्यंत प्रश्न विचारले. यावर कतरिनाच्या आईने दिलेलं उत्तर अभिनेत्रीसाठी फार अभिमान वाटणारं होतं. अभिनेत्री म्हणाली, ‘आईचे अनुभव माझ्यासाठी प्रेरणा देणारे आहेत. आता मला कळतं तेव्हा तिच्यासाठी हे सगळं किती कठीण होतं.’ असं अभिनेत्री म्हणाली. कतरिनाच्या आई – वडिलांचा घटस्फोट झाला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी जैन याच्यासोबत आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहे. दोघे कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.