Katrina Kaif | कतरिना कैफच्या ‘या’ चित्रपटातील एका सीनसाठी वाया घालवलं तब्बल 700 टँक्स पाणी

| Updated on: Jul 16, 2023 | 8:43 AM

या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हॉटेलच्या पाण्याची टाकी फुटते. त्यानंतर संपूर्ण हॉटेलमध्ये पाणी भरतं. या सीनसाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी एकत्र शूटिंग केलं आहे. हा संपूर्ण सीन पडद्यावर जरी अप्रतिम वाटत असला तरी ते शूट करताना दिग्दर्शकांच्या नाकीनऊ आलं होतं.

Katrina Kaif | कतरिना कैफच्या या चित्रपटातील एका सीनसाठी वाया घालवलं तब्बल 700 टँक्स पाणी
Katrina Kaif
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : बॉलिवूड चित्रपटांमधील एका परफेक्ट सीनसाठी अनेकदा दिग्दर्शक प्रचंड मेहनत घेतात. मेहनतीसोबतच ते पैसाही पाण्यासारखा वाहतात. संजय लीला भन्साळी, रोहित शेट्टी यांसारखे मोठमोठे दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातील एका सीनसाठी कधी भलामोठा सेट उभारतात तर कधी आलिशान गाड्यांची तोडफोड करतात. चित्रपटासाठी, त्यातील गाण्यासाठी किंवा सीनसाठी भरपूर खर्च करणं ही काही नवीन गोष्ट नाही. पण तुम्हाला हे माहीत आहे का, की अभिनेत्री कतरिना कैफच्या एका चित्रपटासाठी निर्मात्यांनी पैसा नाही तर लाखो लीटर पाणी वाया घालवलं होतं. याला तुम्ही पाण्याची नासाडी म्हणा किंवा आणखी काही, पण जितकं पाणी या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाया घालवलं, त्यात एका गावातील लोकांची तहान भागवता आली असती.

कतरिनाचा असा कोणता चित्रपट आणि सीन आहे, असा विचार तुम्ही करत असाल. तर 2009 मध्ये कतरिना कैफ आणि अक्षय कुमार यांचा ‘दे दना दन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये या दोघांशिवाय इतरही बरेच कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तसा फार काही चालला नाही. पण फ्लॉपही ठरला नव्हता. मात्र या चित्रपटातील एका सीनला फार पसंती मिळाली होती. याच सीनसाठी निर्मात्यांनी लाखो लीटर पाणी वाया घालवलं होतं. एका हॉटेलमध्ये पाणी भरल्याचा हा सीन होता. त्या पाण्यात सर्व सेलिब्रिटी स्वत:ला वाचवताना दाखवलं गेलं आहे.

हे सुद्धा वाचा

या चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये हॉटेलच्या पाण्याची टाकी फुटते. त्यानंतर संपूर्ण हॉटेलमध्ये पाणी भरतं. या सीनसाठी बऱ्याच सेलिब्रिटींनी एकत्र शूटिंग केलं आहे. हा संपूर्ण सीन पडद्यावर जरी अप्रतिम वाटत असला तरी ते शूट करताना दिग्दर्शकांच्या नाकीनऊ आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हॉटेलमध्ये पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण करायची होती. या क्लायमॅक्स सीनसाठी निर्मात्यांनी 100 किंवा 200 नव्हे तर 700 टँकर्सचं पाणी वाया घालवलं होतं. म्हणजेच जवळपास 84 लाख लीटर पाणी फक्त एका सीनसाठी वापरण्यात आलं होतं. या पाण्यात एक किंवा दोन गावांच्या पाण्याची तहान भागवता आली असती. एका व्यक्तीला दररोज चार ते पाच लीटर पाणी आवश्यक असतं. या हिशोबाने 84 लाख लीटर पाण्यात जवळपास 21 लाख लोकांची तहान भागवता आली असती.