Katrina Kaif एक उत्तम गृहिणीही; प्रत्येक आठवड्यात घेते घरातील कर्मचाऱ्यांची बैठक आणि…

लोकप्रिय अभिनेत्रीच नाही तर, कतरिना उत्तम गृहिणी देखील... घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत कसे आहेत अभिनेत्रीचं संबंध? विकी कौशलचा मोठा खुलासा

Katrina Kaif एक उत्तम गृहिणीही; प्रत्येक आठवड्यात घेते घरातील कर्मचाऱ्यांची बैठक आणि...
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 12:56 PM

मुंबई | सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य कायम चाहत्यांमध्य चर्चेत असते. एवढंच नाही तर, आपल्या आवडत्या सेलिब्रिटीच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. सेलिब्रिटी देखील त्यांच्या रोजच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता सध्या चर्चा रंगत आहे ती म्हणजे अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांच्या खासगी आयुष्याबद्दल. विकी सध्या ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान विकीला त्याच्या खासगी आयुष्यातील देखील प्रश्न विचारण्यात आले. यावर अभिनेत्याने कतरिना प्रत्येक आठवड्यात घरातील कर्माचाऱ्यांची अनेक मुद्द्यांवर बैठक घेते असं अभिनेत्याने सांगितलं…

विकी म्हणाला, ‘मला घरातील एक गोष्ट प्रचंड आवडते, जेव्हा कतरिना घरातील कर्माचाऱ्यांची बैठक घेते. तेव्हा मी मस्त पॉपकॉर्न खात बैठकीचा आनंद घेत असतो. दर आठवड्याला कतरिना कर्मचाऱ्यांची बैठक घेते. त्या बैठकीमध्ये किती खर्च झाला. कोणत्या गोष्टीसाठी अधिकचे पैसे लागले.. अशा अनेक गोष्टींचा आढावा कतरिना दर आठवड्याला घेत असते… ‘

पुढे अभिनेता म्हणाला, ‘कतरीना आणि वायफळ खर्च करत नाही. पैसे बचतीवर आमचा अधिक जोर असतो…’ शॉपिंग करताना कोण बील भरत असा प्रश्न देखील विकीला विचारण्यात आला, या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘ते वस्तूवर ठरलेलं असतं. बजेटनुसार आम्ही खर्च करतो.’ ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान विकीला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत. अभिनेता देखील आनंदाने सर्व प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाच्या माध्यमातून विकी आणि अभिनेत्री सारा अली खान पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसले. सध्या सर्वत्र ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाची चर्चा आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर देखील उत्तम कामगिरी करतना दिसत आहे. सिनेमाने आतापर्यंत जवळपास २६ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे.

‘जरा हटके जरा बचके’ सिनेमात सारा आणि विकी यांच्यासोबत राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. सध्या सर्वत्र सारा आणि विकी स्टारर ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

सध्या सारा आणि विकी ‘जरा हटके जरा बचके’ सिनेमा जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर देखील दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.