रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूर यांचा टोमणा? अखेर कतरिनाच्या आईने दिलं ‘त्या’ पोस्टबद्दल स्पष्टीकरण

रणबीर आणि कतरिनाचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती.

रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंडला नीतू कपूर यांचा टोमणा? अखेर कतरिनाच्या आईने दिलं 'त्या' पोस्टबद्दल स्पष्टीकरण
नीतू कपूर यांच्या टोमण्याला कतरिना कैफच्या आईचं उत्तरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 8:10 AM

मुंबई : ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘राजनिती’ आणि ‘जग्गा जासूस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यानंतर अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कतरिना कैफ एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षांहून अधिक काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2015 – 2016 दरम्यान त्यांचा ब्रेकअप झाला. आता जवळपास सात वर्षांनंतर या दोघांचं रिलेशनशिप पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्यामागचं कारण म्हणजे रणबीरची आई नीतू कपूर यांनी शेअर केलेली एक पोस्ट. नीतू कपूर यांनी त्यांच्या एका पोस्टमधून अप्रत्यक्षपणे कतरिना कैफला टोमणा मारल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी वर्तवला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर या चर्चा सुरू असतानाच कतरिनाच्या आईने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. त्यांची ही पोस्ट म्हणजे जणू नीतू कपूर यांना दिलेलं अप्रत्यक्ष उत्तर होतं की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. आता या संपूर्ण प्रकरणावर कतरिनाच्या आईने स्पष्टीकरण दिलं आहे.

नीतू कपूर यांच्या पोस्टवरून सुरू झाला वाद

शनिवारी नीतू कपूर यांनी रिलेशनशिप आणि लग्नाविषयीची एक पोस्ट त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती. त्यात लिहिलं होतं, ‘त्याने तुम्हाला 7 वर्षे डेट केलं म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तो तुमच्याशी लग्न करेल. माझे काका 6 वर्षे मेडिसीन शिकले, पण आता ते डीजे आहेत.’ नीतू कपूर यांची ही स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याचा संबंध रणबीर कपूरच्या भूतकाळातील रिलेशनशिपशी लावला. त्यावरून काहींनी नीतू यांच्यावर टीकासुद्धा केली.

हे सुद्धा वाचा

कतरिनाच्या आईची पोस्ट

नीतू कपूर यांच्या पोस्टची चर्चा होत असतानाच सोमवारी कतरिनाच्या आईने इन्स्टाग्रामवर आदराबद्दल एक पोस्ट शेअर केली. ‘रखवालदारालाही सीईओप्रमाणेच आदराने वागवण्याची शिकवण मला लहानपणापासूनच मिळाली’, अशी ही पोस्ट होती. कतरिनाच्या आईची ही पोस्ट म्हणजे अप्रत्यक्षपणे नीतू कपूर यांना दिलेलं उत्तरच आहे, असा अंदाज नेटकरी वर्तवू लागले.

View this post on Instagram

A post shared by @susanna_india

आता बुधवारी कतरिनाची आई सुझाना यांनी त्यांच्या पोस्टमध्ये कॅप्शन लिहित स्पष्टीकरण दिलं. ‘मी माझ्या फोनमधील जुने फोटो पाहत असताना ही पोस्ट मला दिसली. मला ती आवडली म्हणून मी पोस्ट शेअर केली. पण ही पोस्ट कोणालाच उद्देशून नव्हती किंवा सोशल मीडियावर बोलल्या गेलेल्या कोणत्याही टिप्पणीला उद्देशून नव्हती’, असं त्यांनी कॅप्शनमध्ये स्पष्ट केलंय.

रणबीर आणि कतरिनाचं रिलेशनशिप इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चेत होतं. जवळपास सहा ते सात वर्षे दोघं एकमेकांना डेट करत होते. त्यावेळी कपूर कुटुंबातील ख्रिसमस पार्टीलाही कतरिनाने हजेरी लावली होती. मात्र ज्यावेळी या दोघांच्या लग्नाच्या चर्चांना सुरुवात झाली, तेव्हाच त्यांचे मार्ग वेगळे झाले. कतरिनाने डिसेंबर 2021 मध्ये विकी कौशलशी लग्न केलं. तर रणबीरने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आलिया भट्टशी लग्नगाठ बांधली.

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.